प्रेमासाठी काही पण असं अनेकदा विनोदाने म्हटलं जातं. पण अनेकजण प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी ठेवतात आणि ते करूनही दाखवतात. प्रेमात पडल्यानंतर कधी कोण काय करतील, याचा काही नेम नाही. नेमका असाच एक भन्नाट किस्सा घडलाय. होस्टेलमधून गर्लफ्रेंडला पळवून नेण्यासाठी बॉयफ्रेंडने चक्क तिला एका सुटकेसमध्ये लपवून बाहेर आणल्याची घटना घडलीय. पण बॉयफ्रेंडचा हा प्लान जास्त काळ टिकू शकला नाही आणि होस्टेमधून बाहेर पडण्याआधीच त्याच्या सगळ्या प्लानवर पाणी फेरलं. नक्की काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊयात सविस्तर…

सोशल मीडियावर घटनेचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जर अगदी निरखून पाहिला की लक्षात येतं की काही कॉलेजमध्ये शिकणारे तरूण होस्टेलच्या गेटजवळ उभे आहेत. एक तरूण हातात भलीमोठी सुटकेस घेऊन गेटजवळ आलेला दिसत आहे. परंतू होस्टेलच्या गार्डने त्याला होस्टेलच्या गेटवरच अडवलं. ही सुटकेस तपासण्यासाठी त्या तरूणाला खाली ठेवण्यासाठी सांगितलं. ज्यावेळी होस्टेलचा गार्ड ही सुटकेस तपासण्यासाठी खोलतो, त्यावेळी त्यातून एक तरूणी बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. हे दृश्य फारच आश्चर्यकारक आहे. एका सुटकेसमध्ये या मुलीला लपवून तिला होस्टेलबाहेर घेऊन येण्याचा हा प्लान त्यांचा पूर्णपणे फसला.

आणखी वाचा : बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि समुद्रावर घिरट्या घालू लागला, पाहा हा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कर्नाटकमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकमधल्या मणिपाल इथल्या होस्टेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. हा व्हिडीओ ?????? ?????? नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. ही घटना सोशल मीडियावर इतकी चर्चेत आली आहे की आता तर सोशल मीडियावर Manipal Suitcase हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून लोक मोठ्या प्रमाणात कमेंट्स सुद्धा करू लागले आहेत.

आणखी वाचा : सिनेमातला सीन नव्हे, रिअल लाइफ मर्दानीचा खरा VIDEO VIRAL; ७३ वर्षीय आजीने एकटीने चोराला पडकलं

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फुल टाईम जॉब करणारी ही बेघर महिला कारमध्येच राहते, जिममध्ये अंघोळ करते, पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही युजर्सनी हा व्हिडीओ एक प्रॅंक असल्याचं म्हटलंय. तर काही युजर्सनी या व्हिडीओवर अनेक विनोदी कमेंट्स शेअर केल्या आहेत. काही काही युजर्सनी या घटनेवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने यावर कमेंट करताना लिहिलं की, “बरं झालं आम्ही योग्य वेळेत शिक्षण पूर्ण करून कॉलेजबाहेर पडलो”. तर आणखी एका दुसऱ्या युजरने विनोदी अंदाजात कमेंट करत लिहिलंय की, “कदाचित या मुलीला सुटकेसमधून फिरायला आवडत असेल”. rachitxdesign नावाच्या आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, “प्रेमासाठी काय पण!” आणखी एका युजरने लिहिलं की, ‘हा व्हिडीओ पाहून तर मला हसू आवरत नाहीय’.