साडी भारतीय संस्कृतीची ओळख आहे. अनेक सेलिब्रेटी देखील नऊवारी साडी आवर्जून नेसतात. भारतीय संस्कृतीच परदेशातील लोकांना एक वेगळचं आकर्षण असतं. सोशल मीडियावर अनेकदा परदेशात राहणाऱ्या भारतीय तरुणी साडी परिधान करून फिरताना दिसतात. दरम्यान पुन्हा एकदा असाच एका व्हिडीओ समोर आला आहे. रशियामध्ये एक तरुणी नऊवारी परिधान करून फिरताना दिसत आहे. व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

महाराष्ट्रात पारंपारिक पोशाख म्हणून नऊवारी परिधान केली जाते. लग्नाला, सणवाराला किंवा शुभकार्याला महिला नऊवारी नेसतात. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीने नऊवारी साडीसह पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. केसांचा खोपा बांधला आहे. नाकात नथ आणि कपळावर चंद्रकोर लावली आहे. तरुणीचा संपूर्ण मराठमोठा साज श्रृंगार पाहून रशियातील लोक थक्क झाले आहेत. लोक वळून वळून तरुणीकडे पाहत आहे. रशियामधील प्रमुख रस्त्यावर ही तरुणी फिरताना दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊडला “मराठमोळी, थोडीशी साधी भोळी, स्वॅग जीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली” हे गाणे ऐकू येत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

हेही वाचा – शेवटी आईचं ती! रस्त्याच्याकडेला बाळाला घेऊन बसलीये महिला, आईचा लेकरावर प्रेमाचा वर्षाव, पाहा हृदयस्पर्शी Video

व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रशियात मराठी लूक, सर्वांच्या मागणीनुसार रील पुन्हा तयार करा… परंतु दुर्दैवाने उन्हाळ्यात बर्फ नाही!” ६,८२,६४७ नावाच्या पेजवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले, सुंदर तर दुसरा म्हणाला,”मराठी मुलगी”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: जीव महत्त्वाचा की, सेल्फी! फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला अन् धाडकन पडला धरणात; पाहा पुढे काय झाले…

एकाने खोचक टिका करत म्हटले की, “भारतात रहाताना वेस्टर्न कपडे घालतात आणि दुसऱ्या देशामध्ये यांना आपली भारतीय संस्कृतीचे संस्कृती कापडे आठवतात, तेही रील बनवण्यासाठी फक्त”