scorecardresearch

मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती, मुलीचे नाव आहे…

Mark Zuckerberg 3rd daughter : शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मार्क यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा केली.

Mark Zuckerberg 3rd daughter
मार्क झुकरबर्ग यांचा लेकीबरोबरचा फोटो (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mark Zuckerberg welcome 3rd daughter: मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न लाभले आहे. नुकतंच त्यांच्या घरी लहान पाहुणीचे आगमन झाले आहे. मार्क यांची पत्नी डॉ. प्रिसिला चॅन यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी मिळून या मुलीचे नाव ‘ऑरेलिया चॅन झुकरबर्ग’ (Aurelia Chan Zuckerberg) असे ठेवले आहे. सोशल मीडियावर मुलीबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी सर्वांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

काही तासांपूर्वी शेअर केलेल्या फोटोमध्ये मार्क त्यांच्या मुलीकडे पाहत बेडवर झोपलेले दिसतात. त्यांनी एका हातांनी ऑरेलियाला धरले आहे. मुलीकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमधून पाहायला मिळत आहे. दुसरा फोटो प्रिसिला यांचा आहे. यामध्ये त्यांनी ऑरेलियाला कुशीत घेतले आहे असे दिसते. या पोस्टला मार्क यांनी “ऑरेलिया चॅन झुकरबर्ग, तुझं या जगामध्ये स्वागत आहे. तूझं येणं आमच्यासाठी देवाच्या आशीर्वादाप्रमाणे आहे”, असे कॅप्शन दिले आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यूजर्स कमेंट करुन त्यांना शुभेच्छा देत आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये मार्क यांनी प्रिसिला गरोदर असल्याची माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी पोस्टमध्ये ‘मी तिसऱ्यांदा बाबा होणार आहे’ असे म्हटले होते. झुकरबर्ग दापंत्याला आता एकूण ३ मुली आहेत. त्यांच्या थोरल्या मुलीचे नाव मॅक्स असे आहे. मॅक्स सात वर्षांची आहे. २०१२ मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलीचा म्हणजेच ऑगस्टचा जन्म झाला. ती पाच वर्षांची आहे. आता ऑरेलियाच्या रुपामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये नवा सदस्याचे आगमन झाले आहे.

आणखी वाचा – Whatsapp webची मदत न घेता वापरा व्हाट्सअ‍ॅप; डेस्कटॉपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मार्क आणि प्रिसिला यांची भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका पार्टीत ते पहिल्यांदा भेटले होते. २००३ पासून त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मे २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. गेल्या वर्षी त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 18:05 IST

संबंधित बातम्या