मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्येच त्यांच्या MDHच्या काही गाजलेल्या जाहिराती चर्चेत आल्या आहेत. याच जाहिरातींमुळे MDH चे मसाले देशभरात लोकप्रिय झाले.

MDH चे मसाले आजही गृहिणींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी MDH च्या जाहिरातींमुळेच हे मसाले खासकरुन लोकप्रिय झाले. त्यात असली मसाले सच सच MDH ही जाहिरात विशेष लोकप्रिय झाली. आजही ही जाहिरात अनेकांना तोंडपाठ आहे.

Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

MDH ची लग्नसमारंभातील जाहिरात (असली मसाले सच सच)

MDH ची व्हेज बिर्याणी मसाल्याची जाहिरात

एकत्र कुटुंबपद्धतीमधील गोडवा सांगणारी जाहिरात ( MDH शाही पनीर मसालाची जाहिरात)

भारतीय परंपरा सांगणारी जाहिरात

MDH च्या मसाल्यांची ओळख करुन देणारी जाहिरात

२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांच्या निधानाचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.