Solar eclipse 2024 : काल म्हणजेच ८ एप्रिल २०२४ रोजी या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा योग होता. हे ग्रहण भारतातून पाहता येणार नव्हते; मात्र अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या देशांच्या काही भागांमधून हे सूर्यग्रहण पाहता येणार होते. जेव्हा चंद्र संपूर्ण सूर्याला काही मिनिटांसाठी झाकतो तेव्हा पृथीच्या काही भागांवर काही क्षणांसाठी अंधारमय वातावरण निर्माण होते. यालाच आपण सूर्यग्रहण म्हणतो.

ग्रहण हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार असून, सोशल मीडियावर झालेल्या सूर्यग्रहणाचे अनेक विस्मयकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांपैकी एका व्हिडीओने सर्व नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवरील southwestair नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चक्क ३५ हजार उंचीवरून उडणाऱ्या विमानामधून या ग्रहणाचे दर्शन घेतल्याचे आपण पाहू शकतो.

DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा : Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उडणाऱ्या विमानाच्या खिडकीतून आकाशाचे व्हिडीओ शूटिंग केले आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रखर सूर्यप्रकाश आणि पांढऱ्या ढगांची शुभ्र चादर पाहू शकतो. मात्र, अगदी काहीच क्षणांत खिडकीबाहेर अंधारून आले आणि अक्षरशः संध्याकाळ झाल्यासारखे दृश्य दिसू लागले. शूट करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडीओद्वारे विमानाच्या बरोबर वर आलेल्या सूर्याचे, सूर्यग्रहणाचे दर्शन आपल्याला दिले. या क्लिपमध्ये चंद्रामुळे झाकोळलेली सूर्याची केवळ प्रखर कोर पाहायला मिळते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला ‘आयुष्यात एकदाच अशी फ्लाइट अनुभवाला मिळते आणि हा अनुभव अप्रतिम होता’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहा.

“मागच्या वेळेस जेव्हा असे ग्रहण होते तेव्हा मीदेखील विमान प्रवासात होतो आणि तो अनुभव खूपच भन्नाट होता,” असे एकाने लिहिले आहे.
“खूपच सुंदर दृश्य आहे.आता मलाही अशा विमान प्रवासाची आशा आहे,” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“वाह अप्रतिम!” असे तिसऱ्याने म्हटले आहे.
“मीसुद्धा असेच ग्रहण पाहिले आहे. माझे विमान क्लेव्हलँडवरून उडत असताना पाहिलेल्या ग्रहणाचा व्हिडीओ नुकताच मी माझ्या अकाउंटवरून शेअर केला आहे,” असे चौथ्याने लिहिले आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @southwestair नावाच्या विमान सेवेच्या अकाउंटद्वारे शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३७K इतके व्ह्युज मिळाले आहेत.