शाळा, कॉलेजमध्ये गणित आणि तो विषय शिकवणारे शिक्षक फारच कमी विद्यार्थ्यांना पसंत असतात. अनेकदा गणिताचे शिक्षक हे कडक शिस्तीचे असतात आणि थोडी चूक झाली तरी लगेच ओरडतात, अशी आपल्या मनात त्यांच्याबद्दल भीती असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हे चित्र थोडे उलट दिसत आहे.

इन्स्टाग्रामवरील class12diaries नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी चक्क त्यांच्या गणिताच्या शिक्षकालाच फळ्यावर समीकरण सोडवण्यास सांगितले. मात्र, हे समीकरण थोडे वेगळ्या पद्धतीचे होते. कारण विद्यार्थ्यांचे गणित सोडवल्यानंतर शिक्षकाला एक खास संदेश मिळणार होता. शिक्षकाने विद्यार्थ्यांनी फळ्यावर लिहिलेले समीकरण पाहिले आणि अगदी एका मिनिटात सोडवले.

student commits suicide despite getting 78 percent in 12th
भाईंदर : बारावीत ७८% मिळवूनही विद्यार्थिनीची आत्महत्या; ९० टक्के न मिळाल्याने होती निराश
loksatta analysis why are doctors in south korea on strike
विश्लेषण : दक्षिण कोरियातील डॉक्टर संपावर का आहेत?
up students loksabha election paper leak
पेपरफुटी आणि बेरोजगारीमुळे भाजपाला निवडणुकीत फटका बसेल? विद्यार्थ्यांच्या भावना काय?
question paper, late, law students,
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक तास उशिरा प्रश्नपत्रिका, मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील प्रकार
right to education latest marathi news, right to education marathi news
शिक्षण हक्क हवा, मात्र पात्र विद्यार्थ्यांसाठीच!
A hilarious answer written by a 5th student
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू
Gujarat student gets 212 out of 200 in primary exam
गुजरातमधील प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप; विद्यार्थ्याला २०० पैकी २१२ गुण; उत्तरपत्रिका पाहून व्हाल लोटपोट
Medical students, change colleges,
वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालय बदलता येणार नाही, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

हेही वाचा : बापरे, तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची झाली चोरी! किंमत बघून व्हाल अवाक! जाणून घ्या नेमके प्रकरण

गणित सोडवून झाल्यावर मिळालेले उत्तर म्हणजेच तो छुपा संदेश पाहून शिक्षक एकदम चकित झाले. कारण त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी ‘वी लव्ह यू’ म्हणजेच आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा संदेश दिला होता. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अशा आदरयुक्त मैत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहा.

“वाह किती भारी!” असे एकाने लिहिले आहे.
“त्या शिक्षकाला किती आनंद झाला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर अगदीच स्पष्ट दिसत आहे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“आमच्या गणिताच्या शिक्षकांना तर हे समजणारच नाही”, अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली.
“गणिताच्या शिक्षकांसाठी हा खूपच प्रेमळ संदेश आहे… मस्त”, असे चौथ्याने लिहिले.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @class12diaries नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १०.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.