Microsoft : मायक्रोसॉफ्टच्या एका माजी कर्मचाऱ्याला कंपनी सोडण्यासाठी तब्बल ६३२,००० डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ब्लाइंड (Blind) या वर्कप्लेस कम्युनिटी ॲपवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एका युजरने हा खुलासा केला आहे. या युजरच्या म्हणण्यानुसार, त्या कर्मचाऱ्याने मायक्रोसॉफ्टमध्ये २४ वर्षे काम केले होते आणि तो १५/५५ रिटायरमेंट स्टॉक प्लॅनसाठी पात्र होता, ज्याची किंमत पेआऊटच्या एकूण रकमेतील अर्ध्याहून अधिक आहे.

पेआउटचे ब्रेकडाउन

पेआऊटबद्दल देण्यात आलेल्या सविस्तर माहितीनुसार, ४०,००० हजार डॉलर्सचे कंटिन्युएशन पे (नोकरीहून काढल्यानंतर चार नियमित पेचेकच्या बरोबरीचे), १४३,००० डॉलर्सचा सेव्हरन्स लंप सम, ४,०००चे माचिंग ४०१ के, १४,००० डॉलर्स किमतीचे सहा महिन्यांचे COBRA प्रीमियम्स, आर्थिक वर्ष २०२५ चा ३९,००० डॉलर्स बोनस, आर्थिक वर्ष २०२५ चे १२,००० डॉलर्सचे स्टॉक व्हिस्टिंग, आणि पुढील चार वर्षांसाठी ३५०,००० किमतीचे रिटायरमेंट स्टॉक व्हिस्टिंग याचा समावेश आहे.

बेरोजगारांना वॉशिंग्टमध्ये काही लाभ मिळतात, त्यानुसार २६ आठवड्यांचा लाभ म्हणजे ३०,००० डॉलर्सची यामध्ये आणखी भर पडली, ज्यामुळे एकूण रक्कम ही ६३२,००० इतकी झाली. कर भरण्याच्या आधीची ही रक्कम आहे, आणि या पेआउटमधून सुमारे ३० टक्के कर कापला जाण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्याने स्पष्ट केले की मायक्रोसॉफ्टने बेरोजगारी लाभ त्यांच्यावतीने कव्हर केले आणि पॅकेजबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी १५/५५ रिटायरमेंट प्लॅनच्या विशेष परिस्थितीचा प्रभाव पडल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

युजर्सच्या प्रतिक्रिया

ब्लाइंडवर यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला की, “जर त्याने एमएसएफटीमध्ये २४ वर्ष घालवली असतील, तर मला वाटते की तो त्या पैशांसाठी पात्र आहे. अनेकांनी कंपन्या बदलल्या असतील किंवा लवकर निवृत्ती घेतली असेल.” तर दुसऱ्या एका यूजरने “नशीबवान व्यक्ती! तो पैसा कोणालातरी मिळाला पाहिजे. मी आनंदी आहे की त्याने मायक्रोसॉफ्टकडून पैशाचा एक छोटासा भाग घेतला.

तिसऱ्या एका युजरने कॉर्पोरेट लेऑफबद्दल मत मांडले, “हे काहीच नाही – हे नियमीत लेऑफ पॅकेज आहे. माझ्या जुन्या कंपनीत वरिष्ठ संचालक, व्हीपी आणि सी-सूट सदस्यांना कधीकधी सल्लागार पदांवर ट्रान्सफर केले जात असे आणि नंतर त्यांना अतिरिक्त सर्व्हेरन्स पॅकेज देऊन गुपचूप काढून टाकले जात असे.”