मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा … विविधतेने नटलेल्या भारताची सुंदरता या एका गाण्यातून किती प्रभावीपणे मांडली आहे.  पण खरंच आपल्याला या सगळ्याचा विसर पडला आहे. आपल्या देशात विविध धर्माचे, जातीचे लोक राहतात, इथे दर कोसाला भाषा बदलते, सर्वाधिक भाषा इथेच बोलल्या जातात. हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहे. इतक्या विविधतेने नटलेला देश क्वचितच जगाच्या पाठीवर आपल्याला सापडेल. विविधतेत एकता हीच तर आपली ताकद आहे नाही का? पण आपण सगळंच विसरत चाललो आहोत.

कुठे धर्म आडवा येतो तर कुठे जात. कुठे धर्माचं राजकारण. पण आपला भारत देश असा नाही याचीच आठवण करून दिलीय ते ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ने, म्हणूनच आज पुन्हा एकदा ट्विटरवर #MileSurMeraTumhara हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅग वापरून प्रत्येक जण आपल्या देशात आजही विविधतेत एकता कशी जपली जात आहे हे दाखवून देत आहे. खरं तर एकमेकांचा द्वेष करणऱ्या किंवा वैमनस्याच्या अनेक बातम्या वा-यासारख्या पसरतात, पण यापलिकडेही एक भारत आहे आणि आपली एकता जपणारे भारतीयही आहेत हेच नेटीझन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तेव्हा हा हॅशटॅग शेअर करून प्रत्येकाने एकेक सकारात्मक गोष्ट शेअर केली आहे, बघा तुम्हालाही आपली एकता दर्शवणारी एक ना एक गोष्ट नक्की सापडेल.

https://twitter.com/MalayaKNayak/status/853986576921219072

https://twitter.com/KalamWalaBae/status/853841048849620992