सोशल मीडियावर सध्या ‘रसोडे मे कौन था’ हा रॅप साँग जोरदार चर्चेत आहे. ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेतील सासू कोकिलाबेन आणि तिची सून गोपी बहू यांच्यातील संवादांवरून हे मजेशीर रॅप साँग तयार करण्यात आलं आहे. यशराज मुखाटे या तरुणाने हा रॅप साँग तयार केला असून त्यामुळे तो रातोरात प्रकाशझोतात आला आहे. हे गाणं प्रचंड व्हायरल झालं असून त्यावर अनेक मिम्सचा आणि डब व्हिडिओचा पाऊस पडला आहे. मात्र याच ट्रेण्डमध्ये सध्या एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये श्याम रंगीला या प्रसिद्ध मिमिक्री आर्टीस्टने चक्क पंतप्रधान मोदींच्या आवाजामध्ये या कूकरमधून चने काढून कुकर गॅसवर कोणी ठेवला यासंदर्भातील मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये श्यामने खास मोदींच्या शैलीत ‘मित्रों..’ स्टाइलमध्ये रिकामा कुकर गॅसवर ठेवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाई और बहनों मी जेव्हा मोराचा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा अचानक मला कोकीलाबेन यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की नरेंद्रभाई आपल्या राशीने रसोड्यात जाऊन कूकरमधील सारे चने काढले आणि रिकामा कूकर गॅसवर ठेवला. भाई और बहनों ही खूपच हृदयद्रावक घटना असून मला याचा त्रास होतो. मी स्वत: पाहिलं आहे की राशीने स्वत:च्या हाताने चने कचऱ्याच्या बादलीत टाकले. राशी बहू यापेक्षा तू ते चने मोराला खायला घातले असते तर अधिक चांगलं झालं असतं,” असं या घटनेचा संबंध लावणारं मजेदार कथन श्यामने केलं आहे. याच व्हिडिओमध्ये त्याने या गोष्टीचा संबंध थेट केंद्र सरकारच्या उज्वला योजनेशी जोडला आहे. “भाई और बहनों तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आमचं सरकार असल्यामुळे उज्वला योजनेअंतर्गत घरोघरी सिलेंडर पोहचले आहेत. त्यामुळेच हे कारनामे होत आहेत. असे कारनामे काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कालावधीत झाले आहेत का? हे आम्ही केलं आहे,” असं श्याम पुढे व्हिडिओत म्हणतो. व्हिडिओच्या शेवटी श्यामने, “चुका सगळ्यांकडून होत असता. मी जेव्हा ट्रेनमध्ये चहा विकायचो तेव्हा रिकामा टोप गॅसवर ठेवायचो,” असंही म्हटलं आहे.

२५ वर्षीय असलेला श्याम शाळेत असल्यापासून अनेकांच्या आवाजाची नक्कल करत आहेत. राजस्थानमधल्या गंगानगर जिल्ह्यात एका छोट्याश्या खेड्यात त्याचा जन्म झाला. २००४ पासूनच शाळेच्या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या नक्कला करत त्यांनी प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर गावागावात नक्कलाचे छोटे मोठे कार्यक्रम करत त्याने नाव कमावले. २०१५ साली त्याने पहिल्यांदा मोदींची नक्कल केली होती. त्यामुळे त्याला अनेकजण ‘राजस्थानचा नमो’ या नावानेच ओळखतात. मोदी जर पाणीपुरी खात असतील तर ते कसे बोलतील असा तो व्हिडिओ होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mimicry artist shyam rangeela does narendra modi mimicry on kokila ben rap song rasodi me kon tha
First published on: 27-08-2020 at 15:06 IST