सोशल मीडियावर कधी, काय आणि कसं व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेकदा सोशल मीडियावर जुने व्हिडीओ अचानक व्हायरल होऊ लागतात. त्यातही अनेकदा जंगलांमधील शिकारीचे किंवा प्राण्यांमधील संघर्षाचे व्हिडीओ व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसून येतात. असाच एक व्हिडीओ महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाड व्हिडीओ शेअर करताना काय म्हणालेत?
अमेझिंग हंटींग म्हणजेच भन्नाट शिकार केलीय अशा कॅप्शनसहीत आव्हाड यांनी हा ५७ सेकंदांचा व्हिडीओ आज सकाळी शेअर केला आहे. या व्हिडीओला तीन तासांमध्ये चाडेचार हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

नक्की पाहा >> Video: चार जणांचं कुटुंब प्रवास करत असणाऱ्या कारला हत्तीची धडक; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

या व्हिडीओमध्ये काय आहे?
हा व्हिडीओ पर्यटकांनी शूट केल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक चित्ता काही अंतरावर कुरणावरील गवत खात असणाऱ्या हरणाची कशाप्रकारे चातुर्याने शिकार करतो हे दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातील पर्यटकांची गाडी उभी आहे त्या कच्च्या रस्त्याच्या कडेला अगदी कॅमेरापासून हाताच्या अंतरावर हा बिबट्या खाली बसलेला दिसतोय. तो हळूहळू पायांमध्ये वाकून पुढे सरकतो.

नक्की पाहा >> एक झडप अन् टप्प्यात कार्यक्रम…; ९४ लाख Views असणारा सिंहिणींच्या ‘टीम वर्क’चा हा Video पाहिलात का?

आपण हरणाच्या नजरेच्या टप्प्यात येऊन नये म्हणून हा चित्ता थोडा पुढे जातो आणि हरणाच्या समोर असणाऱ्या झाडाच्या आडून हळूहळू त्याच्या दिशेने चालू लागतो. दरम्यान दोन वेळा हरिण आजूबाजूच्या परिस्थितीचा वेध घेण्यासाठी मान वर करतं तेव्हा हा बिबट्या जागीच उभा राहतो. आपली चाहूल लागून शिकार पळून जाऊ नये याची तो पूर्ण काळजी घेताना दिसतोय. शेवटच्या काही क्षणांमध्ये हा चित्ता हरणावर झडप घालतो. अगदी शेवटच्या क्षणी चित्ता आपल्या जवळ आल्याचं हरणाच्या लक्षात येतं पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.

नक्की वाचा >> प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्याने दान केली किडनी; महिन्याभरानंतर प्रेयसीने दुसऱ्यासोबतच केलं लग्न

या व्हिडीओ खाली आव्हाड यांच्याप्रमाणानेच अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत चित्त्याने त्या हुशारीने शिकार केली त्याचं कौतुक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister jitendra awhad shared viral video of cheetah hunting in jungle scsg
First published on: 20-01-2022 at 12:42 IST