पेरूमध्ये सुरू असलेली ‘मिस पेरू २०१८’ ही स्पर्धा यावेळी सौंदर्यवतींच्या उपस्थितीमुळे नाही तर वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सौंदर्यवतीनं आपल्या ‘फिगर’पेक्षा महिलांवर होणाऱ्या ‘अत्याचारांच्या फिगर’कडे जगाचं लक्ष वेधलं. महिलांच्या या उत्तरामुळे जणू प्रत्येकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं गेलं, म्हणूनच या सौंदर्यस्पर्धेत भाग घेणारी प्रत्येक सौंदर्यवती चर्चेचा विषय ठरली.
‘मिस पेरू २०१८’ स्पर्धेची एक फेरी रविवारी पार पडली. या फेरीत प्रत्येक स्पर्धकाला पुढे येऊन आपल्या शरीराचं माप सांगायचं असतं. थोडक्यात फॅशन वर्ल्डमध्ये ज्याला ‘फिगर’ असं म्हणतात त्याचा आकडा पुढे येऊन परीक्षकांना सांगायचा असतो. अर्थात प्रत्येकीकडून ‘३६- २४- ३६ ‘ अशा आकड्यांची अपेक्षा करणारे परीक्षक मात्र त्यांच्या उत्तराने चकीत झाले.
ऐकावे ते नवल! जास्त काम करतो म्हणून कर्मचाऱ्याला कामावरून काढलं
कारण या महिलांनी ‘त्या’ आकड्यांपेक्षा आतापर्यंत देशात किती महिलांवर अत्याचार झाले, याची आकडेवारी समोर ठेवली. देशातल्या किती महिला बलात्कार, अॅसिड हल्ले, घरगुती हिंसाचार, विनभंगाला बळी पडल्या त्याची आकडेवारी प्रत्येक स्पर्धकांनी जगासमोर मांडली. ‘या जगात प्रत्येकजण महिलेच्या फिगरविषयी बोलतो पण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय निघाला की सगळेच गप्प होतात. महिला अत्याचारांची आकडेवारी किती मोठी आणि महत्त्वाची आहे, हे सौंदर्यवतीच्या फिगरपेक्षा जाणून घेणं आवश्यक आहे’ असं मत प्रत्येकीनं मांडलं.