हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवशी राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजला. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरिन ड्राइव्हवर घडली. सध्या सोशल नेटवर्किंगवर या घटनेचे फोटो आणि नक्की काय घडलं यासंदर्भात कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी सोशल नेटवर्किंगवर लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अशुतोष यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर मरिन ड्राइव्हला गेले असता घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.

झालं असं की कालचे अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर काळे आणि भरणे ये दोघेही मरिन ड्राइव्हवर गेले. मात्र यावेळी येथील काही तरुणांनी भरणे यांना ओळखलं नाही आणि आमचा एक फोटो काढा ना म्हणत थेट राज्यमंत्र्यांच्या हातात फोन दिला. यासंदर्भात लिहिताना काळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आज विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मरिन ड्राईव्हला फेरफटका मारत असताना काही मुलांनी भरणे यांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का म्हणून विचारणा केली.”

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

तरुणांनी राज्यमंत्र्याकडे ही विनंती केल्यावर काय झालं यासंदर्भात काळे लिहितात, ” त्यांनी लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यावेळी भरणे मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे यांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.” या पोस्टमध्ये काळे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तरुणांचा एक ग्रुप मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर बसला असून समोर पांढऱ्या कपड्यांमध्ये भरणे हे मोबाईल घेऊन या ग्रुपचा फोटो काढताना दिसत आहेत.

भरणे  यांच्या या साधेपणासंदर्भात पुढे काळे यांनी, “मोठी माणसे उगाच मोठी होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. आदरणीय पवार साहेब यांच्याकडून ही गोष्ट नेहमी शिकायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक जण त्यांनी दिलेल्या विचारांनीच वाटचाल करत आहे यात शंका नाही,” असंही म्हटलं आहे.