मॉडेल मारा मार्टिन स्विमसूट फॅशन शोच्या रॅम्पवर उतरली आणि तिच्या या रॅम्पवॉकची जगभर चर्चा झाली. कारण तिनं आपल्या मुलीला स्तनपान करत रॅम्पवॉक केला. पाच महिन्यांच्या चिमुकल्या आरियाला स्तनपान करत रॅम्पवॉक करण्याचं धाडस केल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने तिचं कौतुक केलं. माराच्या रॅम्पवॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आणि त्यावर शेकडो प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर माराने हे केवळ लक्ष वेधण्यासाठी केलेली स्टंटबाजी होती असं म्हणत काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली.

स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड स्विमसूट फॅशन शो दरम्यान तातडीने घेतलेला हा निर्णय होता, असं मारा आणि शोच्या आयोजकांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. ‘माझा रॅम्पवॉक सुरू होण्यापूर्वी आरिया फार रडत होती. तिला भूक लागली होती आणि माझ्या रॅम्पवॉक तेव्हाच सुरू होणार होता. तेव्हा टीममधल्या एकाने आरियाला स्तनपान करत रॅम्पवॉक करण्याचं सुचवलं,’ असं मारा म्हणाली.

https://www.instagram.com/p/BlRqGryH_Mi/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारा मार्टिन ही मिशीगनची राहणारी आहे. तसेच ती त्या १६ फायनलिस्टपैकी एक आहे ज्यांची निवड स्विम वीकसाठी स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझिनद्वारे झाली आहे. या फॅशन शोमध्ये सहभाग घेण्यापूर्वी मारा मार्टिनने आपल्या मुलीसोबतचा एका फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.