जगातील सगळ्यात धोकादायक रस्ता म्हणून नागमोडी वळणाचा चीलीमधला हा रस्ता प्रसिद्ध आहे. दरवर्षी जगातील दहा लाखांहून अधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. वेगमर्यादा न पाळणे, त्याचप्रमाणे सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने हे अपघात होतात. पण काही रस्ते असेही आहेत जिथे चालकाचे खरे कसब पणाला लागते. या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जणू मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. जगातील अशा दहा धोकादायक रस्त्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो नागमोडी रचना असलेल्या ‘लॉस काराकोलेस पास’ या रस्त्याचा. अँडीच्या पर्वत रांगेतून नागमोडी वळणाचा रस्ता जातो. अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांना जोडणारा हा रस्ता आहे. समुद्रसपाटीपासून १० हजार २५१  फूट उंचावर असलेल्या या रस्त्यावरून मुख्यत्त्वे मालवाहतूक केली जाते. सामानाने लादलेले मोठे ट्रक घेऊन या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यू गाठीशी घेऊन फिरण्यासारखेच आहे. एका रस्त्यात जवळपास २० नागमोडी वळणे आहेत तसेच पर्वत रांगेतून हा रस्ता जात असल्याने या ठिकाणी सोसाट्याचा वाराही वाहतो त्यामुळे गाडी चालवणे अवघड होते. या रस्त्यावरुन जाणा-या १० गाड्यांमागे २ अपघात होतात. हिवाळ्यात मात्र हा रस्ता वाहतूकीसाठी बंद केला जातो. या रस्त्यावरून गाडी चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असले तरी अनेक जण थरार अनुभवायला या रस्त्यावरून प्रवास करतात. जगातील सगळ्यात धोकादायक रस्त्याच्या यादीत भारतातील ‘झोगी पास’ या रस्त्याचा देखील समावेश आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!