Mother’s Day Date History Significance ‘आई’ या दोन अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य असे अनेक भाव दडले आहेत. आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी, संकटाच्या वेळी त्यांना साथ देत कुशीत घेणारी आणि त्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात परमेश्वराचे दुसरे रूप असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतर वेळी आई ही व्यक्ती आपल्या आयुष्यात गृहीत धरून असतो, तिची वेगळी दखल घ्यावीशी आपल्याला वाटत नाही. अर्थात हे सगळ्यांना लागू पडते असे नाही. पण आईबद्दल भरभरून बोलले जाते ते म्हणजे मातृदिनी. जगभरात ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. काही देश वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा करतात, पण भारत, अमेरिका (यूएसए), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे १११ वर्षांपासून सुरू आहे. पण आज आम्ही तुम्हाला या दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. या दिवसाची सुरुवात कशी झाली? हा दिवस आईला समर्पित करण्यामागचा उद्देश काय? जाणून घेऊ…

मदर्स डेचा इतिहास

मदर्स डेचा इतिहास ग्रीसशी संबंधित आहे. ज्याला युनान असेही म्हणतात. असे सांगितले जाते की, प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन लोक रिया आणि सायबेले या मातृदेवतांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत होते. मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. पण आधुनिक काळात म्हणजे २० व्या शतकात अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा केल्याचा इतिहास सापडतो.

Earth Day History and importance in Marathi
Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा

कशी झाली मदर्स डेची सुरुवात?

आईला सन्मान देणाऱ्या मातृदिनाची सुरुवात अमेरिकेत झाली. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आईचे अथक परिश्रम, तिचे बलिदान आणि समाजसेवेतील तिची भूमिका यांमुळे तिला खूप प्रेरणा मिळाली. तिचे आईवर खूप प्रेम होते, पण जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली गेली. मग हळूहळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा का करतात मदर्स डे?

९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन २८ वे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल. यानंतर अमेरिकेसह इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

१९०८ मध्ये अमेरिकन काँग्रेसने मदर्स डेला अधिकृत सुट्टी देण्याचा प्रस्ताव नाकारला, पण अॅना जार्विस यांच्या प्रयत्नांमुळे १९११ पर्यंत अमेरिकेतील अनेक राज्यांनी या दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली, त्यांपैकी काहींनी अधिकृतपणे मदर्स डेला स्थानिक सुट्टी म्हणून मान्यता दिली.

मदर्स डेचे महत्त्व

मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम, कौतुक दर्शवण्यासाठी समर्पित आहे. आपल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या माता, कुटुंब आणि समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या मातांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो.