एकेकाळचे ऑस्ट्रेलियामधले अब्जाधीश खाणउद्योजक आणि व्यसायिक म्हणून ज्यांची ख्याती देशभरात होती ते डेव्हिड ग्लासीन गेल्या २० वर्षांपासून एका निर्जन बेटावर राहत आहेत. १९८७ साली आलेल्या आर्थिक मंदीमुळे आपली कोट्यवधीची संपत्ती त्यांनी गमावली. त्यादिवसापासून आपल्या अलिशान जीवनशैलीचा त्याग करून साऱ्या जगापासून दूर ते एका निर्जन बेटावर राहू लागले. जवळपास २० वर्षांच्या अज्ञातवासानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

निखळ प्रेम! पत्नीसाठी त्याने सहा हजार पायऱ्या बांधल्या

एकटेपणा, नैराश्य, अपयश यासारख्या सगळ्या संकटांशी एकाकी लढल्यानंतर आपल्यासोबत निर्जन बेटावर राहण्यासाठी एका सोबतीची गरज आहे, असंही ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर त्यांनी स्वत:साठी छोटीशी झोपडी बांधली. या झोपडीत जीवनावश्यक काही वस्तू आहेत. उंची आणि महागडे कपडे घालणारे, पंचतारांकित हॉटेल्समध्ये पार्टी करणारे डेव्हिड आता सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य जगत आहे. त्यांच्या सोबत त्यांचा लाडका श्वानही २४ तास असतो.

मास्क लावून खेळणाऱ्या लंकन खेळाडूंना डेटॉलने केले ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या निर्जन बेटावर एकटं वाटतं, इथे बोलायलाही कोणी नाही. आता फक्त एखादी जलपरी येईल आणि माझा एकटेपणा घालवेल एवढ्याच आशेवर मी इथे दिवस घालवत आहे’ असं ‘डेली टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत ते उपरोधिकपणे म्हणाले. सौरउर्जेचा वापर करून त्यांनी आपल्या छोट्याश्या झोपडीत विजेची व्यवस्था केली आहे. डेव्हिड यांना ओळखणारे अनेकजण त्यांना भेटायला येथे आवर्जून येतात.