‘अक्षय पात्र फाउंडेशन’तर्फे जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीतेवरील राज्यस्तरीय संस्कृत निबंध स्पर्धेत १६ वर्षांच्या नदीम खान या मुस्लिम विद्यार्थ्यानं बाजी मारली आहे. या स्पर्धेत देशभरातल्या जवळपास ८ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांमधून नदीम हा अव्वल आला आहे. तो दहावीत शिकतो.

Viral Video : मुंबईच्या किनारी डॉल्फिन्स? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ‘अक्षय पात्र फाउंडेशन’तर्फे गीता महोत्सवांतर्गत सोमवारी ही स्पर्धा घेण्यात आली होती. गीतेवर निबंध, गीतेतील श्लोकांचे पठण आणि हस्ताक्षर अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील २०० शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्कृत निबंध स्पर्धेत पहिला आलेला नदीम हा एका सरकारी शाळेत शिकतो. सहावीत असल्यापासून तो संस्कृत भाषेत शिकत आहे. ही भाषा माझ्या अत्यंत आवडीची असल्याचे त्यांनी सांगितलं. आपल्याला संस्कृत भाषेत संवाद साधता यावे असेही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. नदीम हा उत्तम संस्कृत लिहित असला तरी तितकचं अस्खलित संस्कृत बोलता येत नाही, याची मात्र खंत त्यांनी व्यक्त केली.

Viral Video : चालकाविना ट्रक गिरक्या घेऊ लागला, नियंत्रण मिळवेपर्यंत चालकाच्या नाकीनऊ