आवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्यावेळी कशी दिसत असले ना? पृथ्वीवर राहाणा-या आपल्या प्रत्येकालाच याची उत्सुकता असेल ना! म्हणूनच २०१२ मध्ये पहिल्यांदा नासाने रात्रीचा पृथ्वीचा नकाशा समोर आणला होतो. लाखों दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेली पृथ्वी इतकी सुंदर दिसत होती, २०१२ मध्ये नासाने भारताचे अंधा-या रात्रीतले छायाचित्र घेतले होते. हे छायाचित्र तेव्हा खूपच व्हायरल झाले होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून नासा हा प्रयोग करत आहे. यावेळीही ‘अर्थ अॅट नाइट’ या शिर्षकाखाली नासाने २०१२ नंतर अंधा-या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा समोर आणला आहे..

झपाट्याने शहरीकरण होत आहे, पृथ्वीचे रुपच माणासाने बदलून टाकले आहे. हिरवीगार जंगलं नाहिशी झाली आहेत, नद्या नाले, समुद्र बुझवून तिथे हळूहळू मानवी वस्त्या तयार होत आहेत त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांत अवकाशातून पाहिलं तर पृथ्वीचा पूर्ण चेहरा मोहराच बदललेला दिसत आहे आणि पृथ्वीचेच हेच बदलले रुप कॅमेरात टिपले आहे ते नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी. अंधा-या रात्री चंद्राचा प्रकाश हटवून शक्य तितके खरे फोटो घेण्याचा प्रयत्न त्यांच्या टिमने केला आहे. २०१२ नंतर नासाने यावर्षी पृथ्वीचा रात्रीचा नकाशा समोर आणला आहे. आता दर दिवशी हा नकाशा अपडेट करण्याचा प्रयत्न नासाचा आहे.