सध्या सोशल मीडियावर सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का.. हे गाणं कमालीचं व्हायरल झालं आहे. या गाण्यातील शब्दांत बदल करत अनेकांनी त्यात आणखी भर पाडली आहे. त्यामुळे सध्या सगळ्याच्याच मुखात हे गाणं आहे. एकीकडे काही ठिकाणी या गाण्यामुळं वाद होताना दिसतोय. तर दुसरीकडे नाशिकचे शाळकरी मुले मात्र या गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना दुचाकी चालवताना हेल्मेट किती गरजेचं आहे, याबाबत जनजागृती करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओलाही सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. नाशिकच्या इस्पॅलियर शाळेतील चिमुकल्यांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे, हे अत्यंत चपखल भाषेत सांगितले आहे.
सोनू तुला हेल्मेटवर भरोसा नाय का?..
सोनू तू चालवतोस बुलेट
बुलेटवर छान दिसते हेल्मेट
हेल्मेटचा आकार कसा गोल-गोल
सोनू तू आतातरी पोलिसांशी गोड बोल..
अशा आशयाचे गाणे या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे शहरात सातत्याने हेल्मेट व वाहतूक नियमाबाबत नवनवे उपक्रम राबवताना दिसतात. त्यांच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी इस्पॅलियर शाळेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या मदतीने हा व्हिडिओ तयार केला आहे. आता शाळकरी मुलांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी योग्य प्रतिसाद देण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे.
पाहा व्हिडिओ..