scorecardresearch

“मोनिका ओ माय डार्लिंग” गाण्यावर नौदल जवानांचा डान्स; प्रजासत्ताक दिनाच्या परेड रंगीत तालिमचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर भारतीय जवानांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

Navy_Video_Viral
सोशल मीडियावर भारतीय जवानांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. (Photo- Viral Video)

सोशल मीडियावर भारतीय जवानांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नौदलातील जवान बॉलिवूडमधील एका गाण्याच्या संगीतावर नाचताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडचं आयोजन केलं जातं. या परेडमध्ये तिन्ही दलाचे जवान म्हणजेच भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेना भाग घेते. यासाठी दिल्लीच्या राथपथावर प्रजासत्ताक दिवसाचं औचित्य साधत रंगीत तालिम सुरु आहे. यावेळी भारतीय नौसेनेचे जवान एका गाण्यावर थिरकताना दिसले. या गाण्यावर नाचताना जवानांचा उत्साह पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नौदलाचे जवान ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ गाणे गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील ५९ सेकंदाचा व्हिडीओ सर्वांच्याच मनात स्थान निर्माण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक सोशल मीडिया यूजर्स खुश होत आहेत. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओखाली कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु आहे.

देशात २६ जानेवरीला मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधत राजधानी दिल्लीत राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. तसेच परेड आणि थरारक प्रात्यक्षिकं दाखवली जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navy jawan sang and dance on monica o my darling song during rehearsal rmt

ताज्या बातम्या