Nepal protests video: नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी विरोधात GenZ नं केलेल्या आंदोलनामुळं देशातील सत्तेला हादरे बसले आहेत. नेपाळच्या पंतप्रधांनाना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं GenZ नं कालपासून आंदोलन सुरु केलं. आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवलं आहे.सेना आणि पोलिसांच्या हातातून आंदोलकांनी शस्त्र हिसकावून घेतली आहेत. नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामसह २६ सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बंदीविरोधात तेथील Gen Z तरुण रस्त्यावर उतरले आणि पाहता पाहता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलनादरम्यान लोकांनी राजकीय नेत्यांची घरं जाळली. एवढंच नाहीतर संतापलेल्या जनतेने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान विष्णु प्रसाद पौडेल यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी अक्षरशः लाथा मारून त्यांना खाली पाडले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

हा व्हिडीओ काठमांडूच्या रस्त्यावर आंदोलकांनी विष्णु प्रसाद पौडेल यांचा पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ @PicturesFoIder या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, एका आंदोलकाने त्यांना लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर ते उठून पुन्हा पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना भिंतीवर आदळले.

पाहा व्हिडीओ

समाजमाध्यमांवरील बंदीबरोबरच भ्रष्टाचार आणि घराणेशाही या मुद्द्यांवरून संतप्त असलेल्या नेपाळच्या निदर्शकांनी मंगळवारी देशभरातील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केले. निदर्शकांनी महत्त्वाच्या इमारती आणि आस्थापनांमध्ये प्रवेश केला आणि जाळपोळ केली. यामध्ये पार्लमेंटच्या इमारतीसह पंतप्रधानांचे कार्यालय, अनेक महत्त्वाच्या नेत्यांची खासगी निवासस्थाने, राजकीय पक्षांची कार्यालये, सर्वोच्च न्यायालय, विविध मंत्रालये आणि मंत्र्यांची कार्यालये असलेली सिंह दरबारची इमारत इत्यादींचा समावेश आहे. त्याशिवाय ठिकठिकाणचे रस्ते बंद करून, वाहने आणि टायर जाळण्यात आले.

अस्थिरतेचा शाप

काठमांडूू : नेपाळमध्ये २००८पासून तब्बल १४ वेळा सरकार बदलले आहे. हिमालयाच्या सौंदर्याने नटलेल्या या देशाला राजकीय स्थैर्याने ग्रासले आहे. तेथील महत्त्वाच्या राजकीय उलाढालींच्या घटनाक्रमावर नजर टाकूया.

१९५१ नेपाळमध्ये आधी राजेशाही होती. या देशात राणांसह विविध घराण्यांनी राज्य केले. तिथे वंशपरंपरेपेने पंतप्रधानांची निवड केली जात असे. १९५१मध्ये लोकशाहीसाठी झालेल्या चळवळींमध्ये राणांना सत्ता सोडायला लागली आणि नेपाळमध्ये संसदीय लोकशाही अस्तित्वात आली.