SLWvINDW: भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करत मालिका जिंकली. या संघाच्या विजयात स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शानदार खेळी खेळली. मंधानाने ३४ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ३९ तर हरमनप्रीतने नाबाद ३१ धावा केल्या. हरमनप्रीतने ३२ चेंडूत दोन चौकार मारले. हरमनप्रीतला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मॅचदरम्यान मंधानाचा एक जबरा फॅनही श्रीलंकेत दिसला.

सामन्यादरम्यान, एका चाहत्याने हातात पोस्टर धरले होते. त्या पोस्टरद्वारे तो सांगत होता की त्याला स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला. अशी एक ओळ या चाहत्याच्या पोस्टमध्ये लिहिली होती, जी पाहून असे नक्कीच म्हणता येईल की भारतीय महिला क्रिकेटपटूंचे जगभरात खूप चाहते आहेत. या पोस्टरवर असे काही लिहिले होते, जे पाहून चाहतेही भावुक झाले. जबरा फॅनच्या पोस्टरवर लिहिले होते- ‘पेट्रोल नाहीये, तरीही स्मृती मानधना पाहायला आलो.’ या जबरा फॅनचे पोस्टरही सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Ranji Trophy Final: मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने जिंकली सगळ्यांची मनं, ‘या’ कृतीमुळे होतंय कौतुक)

(हे ही वाचा: Video: भारतीय खेळाडूला त्रास देणाऱ्या चाहत्यांची विराट कोहलीने घेतली शाळा; व्हिडीओ व्हायरल)

भारतीय महिला संघाने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना ३४ धावांनी जिंकला होता तर तिसरा आणि अंतिम सामना २७ जून रोजी याच स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखले आणि त्यानंतर १९.१ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

(हे ही वाचा: Video: साहसाच्या नावाखाली प्रेयसीला डोंगरावरून ढकलले, भीतीने किंचाळत तरुणीने हवेतच केलं ब्रेकअप)

श्रीलंकेत आर्थिक संकट कायम

श्रीलंका १९४८ मध्ये त्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ज्यामुळे अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे एकूण बाह्य कर्ज ५१ डॉलर अब्ज आहे. पेट्रोलसाठी लोक रस्त्यांवर लांबच लांब रांगा लावत आहेत.