नोकियाच्या मोबाईमध्ये असणारा स्नेक गेम आठवतोय का? अर्थात आठवत असणार, इंटरनेट आजच्या इतके प्रसिद्ध नव्हते तेव्हा नोकिया वापरणारे सगळेच विरंगुळ्यासाठी हा खेळ खेळायचे. किती प्रसिद्ध झाला होता हा खेळ. हा स्नेक गेम आता लवकरच परत येणार असून फक्त नोकिया फोनवरच नाही तर फेसबुकवरही हा खेळ खेळता येणार आहे.

VIDEO: सात वर्षांच्या मुलाचं डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाला आव्हान

स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकिया मागे पडली आणि हा स्नेक गेमही विस्मृतीत गेला. कँडी क्रश, पॉकेमॉन गो खेळणा-या आताच्या पिढीला हा खेळ थोडीच लक्षात राहणार आहे म्हणा. पण स्पर्धेत नव्याने उतरण्यासाठी सज्ज झालेल्या नोकियाने या नव्या आणि जुन्या वर्गाला नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. बार्सिलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या नवीन स्मार्टफोनबरोबरच जुन्या ३३१० चे रिलाँचींग केले. नव्या ३३१०मध्ये स्नेकगेमचे अपडेटेड व्हर्जन असल्याचेही नोकियाने सांगितले. आता हाच गेम लवकरच फेसबुकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फक्त नोकिया धारकांनाच नाही तर फेसबुक युजर्सनाही हा खेळ खेळता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : नव्या रंगात, नव्या ढंगात ‘नोकिया ३३१०’ चे पुनरागमन

पण भारतीयांना मात्र यासाठी नेहमीसारखीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आपल्या इथलं फेसबुक मेसेंजर इन्टन्ट गेम फिचर्सला सपोर्ट करत नाही.