सोशल मीडियाच्या जगात तुम्हाला सापांशी संबंधित असंख्य आश्चर्यकारक व्हिडीओ पाहायला मिळतील. पण तुम्ही कधी सापाची शिकार होताना पाहिले आहे का? तेही एका माशाकडून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मासाही सापाची शिकार करू शकतो का? पण हे खरे आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मासा सापासारख्या प्राण्याला अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने गिळताना दिसत आहे.

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावरचा एक मासा सापासारख्या प्राण्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. झाडाझुडपातून साप बाहेर येताच मास तिथे पोचतो. त्यानंतर जे काही घडते ते थक्क करणारे आहे. मासा हळूहळू संपूर्ण सापासारखा जीव गिळतो.

( हे ही वाचा: Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स! )

व्हिडीओ व्हायरल

माशांचा हा अप्रतिम व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @nature27_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माश्याने एक मीटर लांब साप गिळला.’ एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. नेटीझन्स या आश्चर्यकारक व्हिडीओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हे मजेदार वाटले तर, बहुतेक वापरकर्त्यांना असे होऊ शकते का? असा प्रश्न पडला.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

( हे ही वाचा: दिल्लीत लखनऊची पुनरावृत्ती! महिलेची भर रस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल)

एका यूजरने आश्चर्याने कमेंट करत लिहिले की, ‘अरे देवा, हे कसे शक्य आहे?’ मला जे दिसते ते खरं आहे का?’याशिवाय अनेक यूजर्स यावर मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आता हा मासा आठवडाभर पडून राहील.’ त्याचवेळी काही यूजर्स सापासारख्या प्राण्याला ईल फिश असल्याचे सांगत आहेत. जो मासा गिळताना दिसतो तो प्रत्यक्षात मेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.