दिल्लीत लखनऊची पुनरावृत्ती! महिलेची भर रस्त्यात टॅक्सी चालकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

राजधानी दिल्लीत लखनऊसारखी घटना घडली आहे. एका महिलेने भर रस्त्यात टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Woman beats taxi driver
महिलेकडून टॅक्सी चालकाला मारहाण (फोटो: Trending Searches / YouTube)

राजधानीत मधल्या रस्त्यावर एका महिलेने टॅक्सी चालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी महिला ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला मारताना दिसते आहे. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, टॅक्सी चालकाची तक्रार आल्यानंतर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.

महिलेचा घेतला जातोय शोध

हा व्हिडीओ पश्चिम पटेल नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस आता व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेचा तिच्या स्कूटीच्या नंबरवरून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन मिनिटांच्या व्हिडूओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मास्क घातलेल्या महिलेने टॅक्सी चालकाला बेदम मारहाण केली.

(हे ही वाचा: Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स! )

व्हिडीओमध्ये दुसऱ्या बाजूला आणखी एक महिलाही होती जी शांतपणे उभी होती. तेथे उपस्थित लोकांच्या बोलण्यातून त्यांना मारहाण करणाऱ्या महिलेची चूक कळत असल्याचे दिसते. तर तिथे उपस्थित असलेले बाकीचे लोक अडवण्यापेक्षा या घटनेचा व्हिडीओ बनवताना दिसले.

गाडीतून ओढले

ही घटना पश्चिम पटेल नगरच्या कस्तुरीलाल आनंद मार्गावरील ब्लॉक-२२ ची आहे. ही महिला दुसऱ्या मुलीसोबत स्कूटीवरून जात होती. रस्त्यावरील कोंडीमुळे टॅक्सी चालची कॅबही तिथेच अडकली होती. टॅक्सी चालकाने महिलेला जागा न दिल्याने रागाच्या भरात महिलेने तिची स्कूटी रस्त्यावर उभी केली. यानंतर शिवीगाळ करत टॅक्सी चालकाला ओढत बाहेर काढले.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

यादरम्यान लोकांनी विरोध केला असता तिने आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडीओमध्ये ती टॅक्सी चालकाचा शर्ट पकडून त्याला मारताना दिसत आहे, तर टॅक्सी चालक या घटनेच्या वेळी शांत आहे हे दिसून येते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली. व्हिडीओ शोधल्यानंतर, फरिदाबादमध्ये सापडलेल्या टॅक्सी चालकाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Delhi repeats lucknow incidence woman beats taxi driver on the street video goes viral ttg

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या