‘ओला’ अॅपमुळे प्रवास अधिक सुखकारक झाला. मुजोर टॅक्सी चालकांच्या मनमानीला प्रवासी वैतागले होते, पण ओलामुळे एका क्लिकवर टॅक्सी उपलब्ध झाली. या अॅपचा एक फायदा आहे तसा तोटाही आहे.

कॅब बुक केल्यानंतर जर ग्राहकांनी बुकिंग रद्द केली, तर त्याबदल्यात त्यांना शुल्क भरावं लागतं. पण गुडगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक अस्थाना या प्रवाशाला थोडा वाईट अनुभव आला. ओला चालकाने परस्पर ‘राईड’ रद्द केली, पण बुकिंग रद्द केल्याचे पैसे मात्र अभिषेकला भरावे लागले. त्यामुळे कंपनीच्या अजब पॉलिसीवर वैतागलेल्या अभिषेकनं ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. ‘राईड चालकानं रद्द केली पण पैसे मात्र माझ्या खिशातून गेले, याला काय अर्थ आहे? हे म्हणजे असं झालं की एखादा ग्राहक दुकानदाराकडे सामोसे मागतोय आणि दुकानदार मात्र ते संपले आहेत असं सांगून पैसेही घेतोय’ अभिषेकनं खोचक ट्विट करत त्यात ‘ओला’ला मेन्शन केलं.

Viral: प्रेयसीच्या ‘त्या’ सवयीला कंटाळून प्रियकराने पाहा गाडीचं काय केलं

त्याच्या ट्विटवर काही अवधीत ओलाकडून उत्तरही आलं. ‘तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो, जे शुल्क तुम्ही भरले आहे ते तुमच्या खात्यात जमा झालं आहे’ असं उत्तर देत ओलानं अभिषेकच्या ट्विटची दखल घेतली इतकंच नाही, तर सामोसे कुठे पाठवायचे असंही त्यांनी विचारलं. पैसे परत आल्यानंतर अभिषेक ती घटना पूर्णपणे विसरून गेला पण दोन दिवसांनंतर ओला कंपनीने अभिषेकच्या घरी चक्क सामोसे आणि छोटंसं पत्रही पाठवलं. या पत्राद्वारे त्यांनी अभिषेकची पुन्हा एकदा माफी मागितली.

Viral Video : बॉलिवूड गाण्यावर थिरकले फिरंगी पोलीस

https://twitter.com/GabbbarSingh/status/922084008313442304

https://twitter.com/Olacabs/status/922485472160391168

https://twitter.com/GabbbarSingh/status/923178673183842304