Operation Sindoor Tiranga Yatra Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. त्या व्हिडीओमध्ये अनेक लोक हातात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर आणि भारतीय तिरंगा फडकवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या नैर्ऋत्येला असलेल्या बलुचिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे, व्हिडीओसह बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याच्या घोषणाही दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, बलुचिस्तानमध्ये अशी कोणती घटना घडली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर डॉ. चिरंजीवी यांनी व्हायरल केलेल्या या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

यावेळी आम्ही तपास सुरू करीत व्हिडीओ प्रथम InVid टूलमध्ये अपलोड केला. त्यानंतर व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या.

यावेळी आम्हाला स्टार हिंदी न्यूज या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला. ज्याच्या शीर्षकावरून असे सूचित होते की, हा व्हिडीओ गुजरातमधील सुरत येथील तिरंगा यात्रेचा आहे.

आम्हाला इन्स्टाग्रामवर आमदार संगीता पाटील यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओशी मिळताजुळता एक फोटोदेखील सापडला. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, या तिरंगा यात्रेत, सुरत महानगराचे अध्यक्ष श्री परेशभाई पटेल, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी आणि हजारो शहरातील लोक एकत्र आले आणि त्यांनी देशभक्ती व्यक्त केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या पोस्टमध्ये आम्हाला व्हायरल व्हिडीओतील दृश्यांसारखी दृश्ये आढळून आली.

एका कीफ्रेमद्वारे, आम्हाला कळले की, तिरंगा यात्रेत सहभागी बँड पथकाच्या ड्रमवर ‘सैफी स्काउट सुरत’ असे लिहिलेले आहे. या बँड पथकाची स्थापना १९५४ मध्ये सुरतमध्ये झाली आहे.

आम्हाला या बँड पथकाच्या इन्स्टाग्राम हँडलवरदेखील व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की : सुरतमधील तिरंगा यात्रा रोमांचक होती. सुरत दाऊदी बोहरा बँडच्या संगीताने या तिरंगा यात्रेची शोभा वाढवली. त्यांची गाणी त्या दिवसाच्या अभिमानास्पद भावनेशी जुळली. ते पाहणे आणि ऐकणे खूप छान होते! ??? #SuratEvents #TirangaVibes #SuratDawoodiBohraBand #IndianCulture #MusicUnitesUs

आम्हाला या कार्यक्रमाबद्दलच्या बातम्यादेखील सापडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.gujaratfirst.com/gujarat/tiranga-yatra-a-grand-tiranga-yatra-was-held-in-gandhinagar-surat-and-rajkot-with-a-large-crowd/215633

निष्कर्ष : सुरतमधील तिरंगा यात्रेचा व्हिडीओ बलुचिस्तानमध्ये लोकांनी स्वतंत्रता जाहीर केल्याचे सांगत व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील बलुचिस्तानचा नाही, तर भारतातील आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.