Optical Illusion Visual Test: सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन पाहायला मिळतात. ऑप्टिकल इल्यूजनचे कोडे सोडवणे हे अत्यंत मजेशीर असते. हे तुमच्या बुद्धीला चालनाही देते. ऑप्टिकल इल्युजन व्हिज्युअल चाचण्या हा तुमच्या संज्ञानात्मक क्षमतेला आव्हान देण्याचा नेहमीच एक मजेदार मार्ग असतो. ऑप्टिकल व्हिज्युअल चाचण्यांमधले आव्हान हे आहे की, तुम्हाला दिलेल्या वेळेत एखादी गोष्ट शोधून काढावी लागेल. तुम्ही या आव्हानासाठी तयार आहात का?

खाली दिलेल्या प्रतिमेत, तुम्हाला चेरीची बाग आहे. या चेरीच्या बागेत टोमॅटो दडलेला आहे जो तुम्हाला फक्त११ सेकंदात शोधायचा आहे. पाहिल्यानंतर हे सोपे वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात तुम्ही हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की, वाटते तितके सोपे नाही. अनेकदा समोर असूनही डोळ्यांना फोटोतील फरक दिसून येत नाही. पण तुमची नजर तीक्ष्ण असेल तर नक्की सापडेल.

हेही वाचा – आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”

तुम्हीदेखील ११ सेकंदामध्ये हे चेरीमध्ये दडलेले टोमॅटो शोधून काढा. चिटींग करू नका. प्रमाणिकपणे खेळा तरचं मज्जा येईल. नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला टोमॅटो लगेच दिसेल.

जर तुम्ही ११ सेकंदात टोमॅटो शोधू शकत असाल, तर तुमचे डोळे खरोखर तीक्ष्ण आहेत आणि तुमची संज्ञानात्मक क्षमता उत्कृष्ट आहे.

प्रामणिकपणे प्रयत्न करून जर तुम्हाला टोमॅटो कुठे दडलेला आहे सापडला नाही, हरकत नाही. आम्ही तुमची मदत करणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत आम्ही फोटो कुठे दडला आहे ते दाखवले आहे.

Optical Illusion Visual Test : ११सेकंदात चेरीच्या गुच्छांमध्ये टोमॅटो शोधण्याचे आव्हान स्वीकारा

तुम्हाला मज्जा आली आहे का? बरं, ऑप्टिकल इल्युजन व्हिज्युअल चाचण्या सोडवण्याची ही मजा आहे. नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला टोमॅटो लगेच दिसेल. चाचणी तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि ते दिलेल्या वेळेत टोमॅटो शोधण्यात सक्षम आहेत का ते पहा. कुटुंबियासह हा खेळ खेळयला तुम्हाला नक्कीच मज्जा येईल.