Wedding Viral News : लग्नात हुंड्याची मागणी केल्याने कौंटुंबिक कलह निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. हुंडाबळीसाराखी घातक प्रथा आजही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु आहे. हुंड्यासाठी मुलींचा मानसिक छळ झाल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. पण गडगंज श्रीमंती असलेल्या माणसांना हुडां देणे साधारण गोष्टच वाटत असावी. कारण दुबईत झालेल्या एका शाही विवाहसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या एका उद्योगपतीने मुलीच्या वजनाएवढ्या सोन्याच्या विटा हुंडा म्हणून दिल्या. तराजूत मुलीला बसवून दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या विटा ठेवल्या गेल्या. सोन्याचं मोजमाप करण्यासाठी मुलीला तराजूत बसवल्याचा कारनामा पाकिस्तानच्या या उद्योगपतीने केला. सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून नेटकऱ्यांनी त्या कुटुंबियांना ट्रोल केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शाही विवाहसोहळा दुबईत पार पडला. पाकिस्तानच्या एका उद्योगपतीनं या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं समजते आहे. या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. पण सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा रंगलीय. नवरीचं वजन ६९-७० असल्याने तेव्हढ्याच वजनाच्या सोन्याच्या विटा हुंडा म्हणून देण्यात आल्या. लग्नात हुंडा म्हणून सोनं देण्याची प्रथा काही ठिकाणी सुरु असल्याचं या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समोर आलं आहे. पाकिस्तानवर सध्याच्या घडीला आर्थिक संकट ओढवलं असताना दुसरीकडे मात्र लग्नात सोन्याच्या विटा हुंडा म्हणून देत आहेत, या गंभीर प्रकाराबाबत अनेकांनी टीका केली आहे.

नक्की वाचा – या पक्षाने आख्ख्या जगाला मानवता धर्म शिकवला, तरुणासोबत ४० किमीचा प्रवास का केला? पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानमध्ये मंदीचं सावट पसरलं आहे. पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाल्याने कर्ज काढण्याच्या इराद्यात पाकिस्तान सरकार असल्याचं बोललं जात आहे. असं असतानाही पाकिस्तानच्या एका उद्योगपतीने मुलीच्या लग्नात सोन्याच्या विटांचा बाजार मांडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात केली जात असल्याचंही समजते आहे. पाकिस्तानी सरकारकडून अधिकाऱ्यांना पैसे बचत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विदेशात गेल्यावर अधिकाऱ्यांनी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.