डेली टाईम्सच्या स्तंभलेखकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका छोट्या मुलीच्या हातात तिच्या वडिलांनी AK- ४७ दिली आहे. ही बंदुक मोदी आणि भारताविरुद्ध कशी वापरायची हे तिला शिकवत आहे. हा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर टाकताच तो लगेच व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाद विकोपाला पोहचले आहे, त्यातच भारताने पाकिस्तानाला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सुनावले आहे. या दोन्ही देशातील हाडवैराचा हा व्हिडिओ उदाहरण आहे. याच हाडवैराचे बीजच जणू तिचे वडिल या मुलीच्या मनात रोवू पाहत आहेत. वडिलांनी लहान मुलीच्या हातात AK- ४७ दिली आहे. त्यांनी या बंदूकीतून मुलीला गोळ्या कशा झाडायच्या हे देखील दाखवले आहे. ही मुलगी व्हिडिओमध्ये भारत आणि मोदी या दोन नावांचा सारखा उल्लेख करते आहे. जणू ती भारताला धमकावू पाहत आहेत. या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डेली टाईम्सच्या स्तंभलेखक मोहम्मद ताकी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि एका दिवसात हजारो लोकांनी तो पाहिला आहे. जेव्हा आंधळ्या राष्ट्रप्रेमाची पट्टी मुलांच्या डोळ्यावर बांधली जाते तेव्हा असे घडते अशा प्रकारची ओळही त्यांनी लिहली आहे. ही मुलगी भारताला आणि मोदींना धमकी देऊ पाहते आहे असे ट्विटही त्यांनी केले आहे.
When jingoism trickles down to the kids. The despicable dad lets a child fire AK-47 as she threatens Modi & Indiahttps://t.co/vPQGFq1mhJ
— Mohammad Taqi (@mazdaki) September 23, 2016