scorecardresearch

Video: वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’; निखाऱ्यात हात घातला अन्…

सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आगीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसत आहे

Mulugu man agni pariksha viral
व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हात जोडून आगीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आगीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यंनी या व्यक्तीला आगीतील एक रॉडदेखील आपल्या हाताने उचलायला लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या मोठ्या भावाच्या बायकोसोबत अफेअर करण्याची सजा पंचायतीने या व्यक्तीला दिली आहे.

का द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’ ?

व्हिडीओतील व्यक्तीचे त्याच्या मोठ्या भावाच्या बायकोसाबत अफेअर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावच्या पंचायतीने त्याला जळत्या निखाऱ्यातून तापलेला लोखंडी रॉड बाहेर काढण्याचा आदेश दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेलंगणातील मुलुगु गावातील आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हात जोडून आगीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे.

हेही पाहा- जाळ्यात तडफडणाऱ्या कावळ्याला चिमुकल्याने दिलं जीवदान, Viral Video पाहून तुम्हीही भारावून जाल

हेही पाहा- ब्रेकअपसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला WhatsApp वर पाठवलं ‘लेटर टू क्लोजर’; सही केलेल्या पत्राचा फोटो Viral

या व्यक्तीने फक्त पॅन्ट घातली असून व्हिडिओमध्ये काही लोकांचा आवाजही ऐकू येत आहे. ते लोक या व्यक्तीला जाळात हात घालून रॉड उचलण्यास सांगत आहेत. दरम्यान, हा व्यक्ती दोनदा आगीला प्रदक्षिणा घालतो आणि लोखंडी रॉड उचलून फेकून देतो. यानंतर तो तेथून निघून गेल्याचंही दिसत आहे. या व्यक्तीचे नाव गंगाधर असल्याचं सांगण्यात आले आहे.

स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी या व्यक्तीला हे सर्व कृत्य करावे लागलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. शिवाय या घटनेमागे ११ लाखांचा व्यवहार असल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुलुगु सब इन्स्पेक्टर पी लक्ष्मा रेड्डी यांनी गंगाधरचा मोठा भाऊ नागय्या आणि ८ गावकऱ्यांविरुद्ध IPC कलम ३३६ दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे, या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 12:10 IST
ताज्या बातम्या