Dubai storm viral video : एखाद्या सुपरहिरो सिनेमामध्ये व्हिलनची एंट्री होणार असते तेव्हा सर्वत्र अंधारून येते, वीज चमकतात; तर कधी आभाळाचा रंग बदलून सगळीकडे लाल, हिरवा प्रकाश पडू लागतो. सध्या सोशल मीडियावर अशाच वातावरणाचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडीओ कोणत्याही सिनेमा किंवा मालिकेमधले नसून दुबईच्या वादळाचे आहेत.

१५ एप्रिलपासून दुबई शहरात वादळाने घातलेल्या थैमानाने दुबईसारख्या अत्यंत सुंदर शहराची अक्षरशः वाताहत झालेली आपण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून पाहू शकतो. वादळी वाऱ्यांनी अनेकांच्या घरातील सामान उडवून नेले, रस्त्यांवरील झाडे उन्मळून पाडली. धो-धो पडणाऱ्या पावसाने दुबईत पूर आल्याने असंख्य गाड्या पाण्यात वाहून गेल्या. विमानतळ, सार्वजनिक वाहतूक सर्वकाही ठप्प झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील.

Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Passenger shares video of Kashi Express’s overcrowded coach.
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral

हेही वाचा : एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित

मात्र, वादळादरम्यान आभाळाने धारण केलेल्या आणि अगदी एखाद्य सिनेमामध्ये दाखवावे तसेच हिरव्या रंगाच्या रूपाचा, छातीत धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम, एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सर्व माध्यमांवरून फिरणाऱ्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला, पावसाळी ढगांची गच्च चादर शहरातील इमारतींवरून पुढे सरकताना दिसते. त्यानंतर हळूहळू त्या ढगांच्या रंगात बदल होऊन ते राखाडी रंग धारण करतात, त्यासह पावसाला सुरुवात होऊन विजा चमकताना दिसतात.

नंतर पावसाचा जोर अतिप्रचंड प्रमाणात वाढून, ढगांचा राखाडी रंग जाऊन संपूर्ण आभाळाला गडद हिरवा रंग प्राप्त झाला. शेवटी पावसाचा जोर इतका वाढला होता की समोरचे दृश्यही दिसेनासे झाले, असे या टाइमलॅप्स व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. या व्हिडीओवरून आपण तिथे काय परिस्थिती आहे याचा केवळ अंदाज लावू शकतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहू –

“हे सर्व ‘क्लाउड सीडिंग’चे परिणाम आहेत!” असे एकाने लिहिले आहे.
“हा प्रकार नक्कीच मानवनिर्मित वातावरणाचा आहे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“बापरे, जागतिक तापमान वाढीचे भयंकर परिणाम” तिसऱ्याने म्हटले.

हेही वाचा : २० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…

एक्स [ट्विटर] व्हिडीओ पाहा :

इन्स्टाग्राम व्हिडीओ पाहा :

सोशल मीडियावर अनेकांनी हा सर्व प्रकार ‘क्लाउड सीडिंग’चा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावरील अनेक अकाउंट्सने असे व्हिडीओ शेअर केले आहेत.