scorecardresearch

हत्तींसोबत सेल्फी घेण्यासाठी रस्त्यातच गाड्या थांबवल्या, पुढे काय घडतं? पाहा VIRAL VIDEO

रस्त्यावर आपल्या गाड्या थांबवून हत्तींसोबत सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांसोबत पुढे जे घडतं ते पाहणं फार मजेदार आहे.

हत्तींसोबत सेल्फी घेण्यासाठी रस्त्यातच गाड्या थांबवल्या, पुढे काय घडतं? पाहा VIRAL VIDEO
(Photo: Twitter/ supriyasahuias)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. आज काल लोक व्हिडीओ आणि फोटोंसाठी आपला जीव कसा धोक्यात घालतात, हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसते आहे. रस्त्यावरून जात असलेल्या हत्तींच्या कळपासोबत सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी आपल्या गाड्या रस्त्त्यावरच थांबवलेल्या दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी मंडळींनी संताप व्यक्त केलाय. रस्त्यावर आपल्या गाड्या थांबवून हत्तींसोबत सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांसोबत पुढे जे घडतं ते पाहणं फार मजेदार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ IAS अधिकारी सुप्रिया साहू ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही जंगली हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने कार आणि दुचाकीस्वार तेथे पोहोचतात. हत्तींचा कळप पाहिल्यानंतर ते कार आणि दुचाकी थांबवतात आणि सेल्फी घेण्यास सुरुवात करतात. यादरम्यान दोन मुले रस्त्यावर येतात आणि हत्तींसमोर उभे राहून सेल्फी काढतात.

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सेल्फी घेत असताना त्या तरुणाच्या मागे उभ्या असलेल्या हत्तींनी त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यावर उभा असलेला तरुण तेथून जाण्याऐवजी सेल्फी घेण्यात मग्न होता. यामध्ये हत्ती थांबतात पण पुन्हा लोकांच्या गर्दीकडे धावतात, लोक घाबरून पळून गेल्यानंतर सर्व हत्ती पुन्हा जंगलाच्या दिशेने उतरतात.

हा व्हिडीओ ट्विटर हँडलवर शेअर करताना IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी लिहिले की, वन्यजीवांसोबत सेल्फीची क्रेझ प्राणघातक असू शकते. हे लोक (सेल्फी घेणारे) भाग्यवान होते की हत्तींना त्यांना कोणती दुखापत केली नाही. नाहीतर हत्तींना लोकांना धडा शिकवायला जास्त वेळ लागत नाही.

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : CWG 2022: “कोहिनूर पुन्हा परत आणतील!”, भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीवर या माजी क्रिकेटपटूचं ट्विट VIRAL

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. या व्हिडीओला आतापर्यंत ६५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १,९०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स विविध कमेंट करत आहेत. सेल्फी काढणाऱ्यांवर कडक कारवाई आणि दंडाची मागणी अनेकांनी केली आहे. अशा घटना कमी करण्यासाठी वनविभागाने प्राण्यांसाठी कॉरिडॉर बनवायला हवे, असे अनेकांनी लिहिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People stop car midway to take selfie with elephant herd what happens next will scare you prp

ताज्या बातम्या