Rat died in dishwasher: विनोद हे मजेशीर असतातच, पण काही वेळा ते मर्यादा ओलांडतात हेही तितकंच खरं आहे. याचं उदाहरण म्हणजे एका तरूणीच्या वडिलांनी त्यांचा पाळीव उंदीर हॅमस्टर याच्या मृत्यूला चुकून कारणीभूत ठरले. त्यानंतर तिच्या वडिलांनी ही बातमी तिला शांतपणे सांगितली नाही, तर त्याबाबतचा एक एआय व्हिडीओ तयार केला आणि तिला हॅमस्टर या जगात नसल्याची बातमी त्यांनी दिली. ही बातमी कळल्यानंतर या तरूणाली रडू आवरले नाही आणि तिने या संपूर्ण घटनेबाबत एक पोस्ट केली.
नेमकं काय घडलं?
हॅमस्टर मिस्टर अलेक्झांडर हा एक पाळीव उंदीर होता. तो त्याच्या पिंजऱ्यात होता आणि काही वेळासाठी तो बाहेर आला होता. बाहेर आल्यावर तो काहीवेळ घरभर इकडे तिकडे फिरत होता. त्यानंतर तो जाऊन डिशवॉशरमध्ये लपला. दुर्दैवाने, या तरूणीच्या वडिलांना हॅमस्टर डिशवॉशरमध्ये असल्याचं ठाऊक नव्हतं. त्यांनी कामासाठी डिशवॉशर सुरू केला आणि त्यातच हॅमस्टरचा अंत झाला.
या तरूणीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या वडिलांनी हॅमस्टरला डिशवॉशरमध्ये धुतले. एवढासा हॅमस्टर मिस्टर अलेक्झांडर त्याच्या पिंजऱ्याच्या बाहेर आला. त्याला डिशवॉशर उघडा दिसला आणि जणू काही नार्निया असल्यासारखं तो त्यात शिरला. वडिलांनी डिशवॉशर सुरू केला आणि त्याचा अंत झाला. जिथे कुठे असशील तिथे शांततेत जग, मिस्टर अलेक्झांडर…”
याउलट या तरूणीच्या वडिलांनी अलेक्झांडर एक योद्धा असे म्हटले होते. अलेक्झांडरच्या एआय इमेजला एखाद्या योद्ध्याप्रमाणे संरक्षक हेल्मेट, तलवार आणि कपडे घातलेलं दाखवण्यात आलं आहे. एआयनिर्मित या व्हिडीओमध्ये अलेक्झांडर स्वत: बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, “कॅन्टीना,मला माफ कर मी आता नाही. मी डिशवॉशरमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी गेलो. तुझ्या वडिलांनी मला पाहिले नाही आणि त्यांनी डिशवॉशर सुरू केले.”
कॅन्टीनाची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला सांत्वन देत कमेंट्स केल्या आहेत आणि तो नक्कीच स्वर्गात असेल असे म्हटले आहे.