Viral Video : कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र म्हणून ओळखला जातो. माणूस जितका कुत्र्यावर प्रेम करतो तितकाच कुत्रा सुद्धा माणसांवर प्रेम करताना दिसतो. असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने एका चिमुकलीला पायऱ्यावरून पडताना वाचवले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मालकाबरोबर खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ चर्चेत येतात. अनेकदा मालक सुद्धा आवडीने कुत्र्याचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. तुम्ही अनेक व्हिडीओमध्ये कुत्र्याचा प्रामाणिकपणा पाहिला असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल ती कुत्र्याला माणसाचा चांगला मित्र का मानतात.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा निवांत बसलेला दिसत आहे आणि त्याच्या जवळ एक चिमुकली खेळताना दिसत आहे. चिमुकली खेळता खेळता पायऱ्यांकडे जाताना दिसते. हे पाहून कुत्रा धाडकन उठतो आणि चिमुकली जवळ जातो आणि तिला बाजूला करतो. एवढंच काय तर चिमुकली पुन्हा जाऊ नये म्हणू पायऱ्यांजवळ जाऊन बसतो पण तरीसुद्धा ती पु्न्हा पायऱ्याकडे जाताना दिसते तेव्हा कुत्रा पु्न्हा उठतो आणि तिला बाजूला घेऊन जातो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अनेकदा कुत्रा माणसांबरोबरची मैत्री निभवताना दिसतो.
असं म्हणतात की प्राण्यांवर आपण प्रेम केले तर ते दुप्पट आपल्यावर प्रेम करतात. कधी मैत्री निभवताना दिसतात तर कधी प्रामाणिकपणा दाखवतात. त्यामुळेच कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र आहे.

हेही वाचा : बापरे! खेळ जीवावर बेतला; गारुड्याला चावला साप, हातावर ब्लेडनी केले सपासप वार; पाहा VIDEO

Figen या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याच कारणामुळे कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे आणि ते खूप मौल्यवान आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मांजरीबरोबरचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलेय, “मांजर सुद्धा माणसाची खूप चांगली मैत्रीण आहे” तर एका युजरने लिहिलेय, “कुत्रा हा शेवटपर्यंत साथ देणारा मित्र आहे.” अनेक युजर्सनी कुत्र्याचे आणि मांजरीचे व्हिडीओ शेअर केले आहेत.