सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करताना अनेकदा असे अनुभव येतात ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सोयी-सुविधेच्या अभावामुळे नव्हे तर चोरट्यांमुळे होतो. प्रवास करताना अनेक प्रवाशांच्या पाकीट, पर्स, दागिने आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यामुळे प्रवाशांना वाईट अनुभव सहन करावा लागतो. मेट्रो- बसमध्ये प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. दिल्लीतील बसमध्ये एका चोरट्याने प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. हा चोरी बसमधील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

एक्सवर ‘घर के कलेश’ नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना , “DTCमध्ये फोन चोरणारा चोरटा” असे कॅप्शन दिले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक बसथांब्यावर बस थांबतात काही प्रवासी बसमध्ये चढतात. त्यामध्ये एक तरुणही चढतो आणि तो दरवाज्यात उभा राहतो. दरवाज्या बाजूच्या सीटवर एक तरुणी बसली आहे जी मोबाईलमध्ये व्यस्त आहे. दरवाजा बंद होण्या आधी चोरटा तिच्या हातातील मोबाईल खेचतो आणि पळून जातो. तरुणीला काय घडले हे समजण्याआधी चोरटा तेथून गायब होतो. आपला मोबाईल घेऊन चोरल्याचे लक्षात येताच तरुणी बसमधून बॅग घेऊन खाली उतरते. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा –“फुलांचा नव्हे, हा तर पाणीपुरी बुके!”, कुटुंबाने लाडक्या लेकीला वाढदिवशी दिले भन्नाट गिफ्ट, Video Viral

हेही वाचा –‘तोंड पुसायचा रुमाल नाही, ती लग्नपत्रिका आहे!’, नेटकऱ्यांना आवडली ही इको फ्रेंडली कल्पना, Viral Video बघा

व्हायरल व्हिडीओ पाहून बसने प्रवास करणाऱ्या प्रवासांची चिंता वाढली आहे. . असा प्रसंग कोणत्याही प्रवाशासह घडू शकतो. व्हिडीओ ६८.२ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रवाशांनी बसमध्ये प्रवास करताना सावध राहीले पाहिजे सुचना दिली आहे. एकाने लिहिले, सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करताना प्रत्येकाने आपल्या आसपास काय घडत आहे याबाबत जागरुक राहिले पाहिजे. दुसऱ्याने लिहिले, “बसमध्ये खरचं असे प्रकार घडतात.” तिसरा म्हणाला, “पोलिस सहज फोटव शोधू शकतात पण ते हे काम कधीही करत नाही”