ज्या राजमहालाबाहेर उभं राहून लहानपणी मेगन हिनं फोटो काढले होते, तीच मेगन मार्कल आता ब्रिटनच्या शाही घराण्याची आणि या राजमहालाची सून होणार आहे. मेगन १५ वर्षांची असताना बकिंगहॅम पॅलेस पाहण्यासाठी आली होती. तेव्हा इतर पर्यटकांसारखाच या पॅलेसच्या बाहेर फोटो काढण्याचा मोह तिलाही अनावर झाला होता. त्यावेळी या राजघराण्याची आपण सून होऊ, असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. मेगनचा हा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजतोय. एखाद्या परिकथेप्रमाणे मध्यमवर्गीय घरात वाढलेली ही मुलगी लवकरच ब्रिटनचा राजकुमार हॅरीसोबत विवाहबद्ध होणार आहे.

वाचा : अन् एका सामान्य मुलीला खरंच स्वप्नातला ‘राजकुमार’ भेटला

Viral : दिसायचं होतं अँजेलिना जोलीसारखं पण, झालं काहीतरी भलतंच

नुकतीच प्रिन्स हॅरी आणि मेगन यानं औपचारिकरित्या आपल्या नात्याची घोषणा केली आहे. मेगन ही लॉस एंजेलिसमधल्या मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाली. पुढे अभिनयात करिअर करण्यासाठी तिनं नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या मेगन अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध मालिकेत काम करत आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाह विंडसर कॅसलमधल्या सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये मे २०१८ मध्ये पार पडणार असल्याचं केंजिंग्टन पॅलेसमधल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. राजघराण्याची सून झाल्यानंतर आपण मालिकेला सोडचिठ्ठी देणार असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.