Flash Flood In oman viral video : ओमानमध्ये यावर्षी अचानक आलेल्या पुराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पुरात अडकलेल्या मुलांना जीवाची बाजी लावून एका तरुणाने वाचवलं होतं. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान, हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल आहे. कारण पुरात अडकलेल्या मुलांना एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. मुलांचा देवदूत बनणाऱ्या या तरुणावर नेटकऱ्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आतपर्यंत या व्हिडीओला ३८ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला प्रचंड लाईक्सही मिळत असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओमानच्या पुराचा थरारक व्हिडीओ झाला व्हायरल

ओमानमध्ये यावर्षी अचानक आलेल्या पुरामुळं सर्वत्र खळबळ उडाली होती. पुराचा पाण्याचा वेढा परिसरातील घरांना बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दरम्यान पुराच्या पाण्यात काही मुलं अडकली होती. पण छायाचित्रकार अली बीन नासेर अल-वर्दी याने स्वत:चा जीव धोक्यात टाकून या मुलांना वाचवलं होतं. दोन मुलं पुराच्या पाण्यात अडकल्याचं पाहिल्यानंतर त्याने तातडीनं पाण्यात उडी मारून त्या मुलांना वाचवलं. पुराच्या पाण्यातून मुलांना बाहेर घेऊन येत असताना किनाऱ्यावर असलेल्या लोकांनीही अलीला मदत केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तिघंही पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर आल्याने लोकांनी मोकळा श्वास घेतला आणि मोठा अनर्थ टळला.

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “या धाडसी माणसाला सलाम.” असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसरा एक युजर म्हणाला, “प्रेरणादायी…याला सीमा नाही.” अनेक ठिकाणी पुर आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. पण या व्हिडीओनं नेटकऱ्यांनी मनं जिंकली आहेत. कारण कोणत्याही प्रकारचं मदतीचं साधन नसताना या तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून मुलांना पुरातून वाचवलं, हे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. “हाच खरा हिरो आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देत मुलांना वाचवणाऱ्या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographer saves children from drowning in water netizens calls him real life hero flash flood in oman video goes viral on twitter nss
First published on: 22-12-2022 at 12:41 IST