सोशल मीडियावर एका फोटोने सध्या अनेकांना चक्रावून सोडले आहे. कारण या फोटोमधल्या एका कोड्याची उकलच होत नाही आहे. पहिल्यांदा पाहिला तर हा फोटो अगदी सामान्य फोटो वाटेल पण या फोटोमध्ये एक कोडे लपले आहे. त्यामुळे या फोटोतील कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी आपले डोके खाजवायला सुरूवात केली आहे.

वाचा : ‘छत्तीसगढ’मध्येही माणुसकीची भिंत

रेडिटवर @jr0d7771 नावाच्या एका युजरने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सहा मुली एका सोफ्यावर बसल्या आहेत. तसे या फोटोमध्ये काहीच वेगळे नाही पण नंतर मात्र सगळ्यांनाच या फोटोने विचारात पाडले. कारण या फोटोमध्ये ६ मुलींचे चेहरे दिसत आहेत पण पाय फक्त पाच जणींचे दिसत आहेत त्यामुळे नेमक्या किती मुली या फोटोत आहेत असा संभ्रमात टाकणारा प्रश्न या आकाऊंटवरून विचारण्यात आला.  या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी आपल्या डोक्यावर ताण दिला. फक्त रेडिटच नाही तर फेसबुक, ट्विटरवर देखील हा फोटो व्हायरल होत आहे.

वाचा : ‘नाताळात येशू ख्रिस्ताऐवजी माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तुम्हाला याचे उत्तर सापडले नाही तर फार टेन्शन घ्यायची गरज नाही कारण या प्रश्नांचे उत्तर आहे सहा. या फोटोमध्ये सहाच मुली आहेत.  डावीकडून दुस-या स्थानावर बसलेल्या मुलीचे पाय हे पहिल्या मुलीमुळे झाकले गेले आहेत त्यामुळे ते दिसत नाही. म्हणूनच नक्की सहा मुली की पाच मुली असा संभ्रम निर्माण होत आहे.