सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होणे किंवा नेटिझन्सकडून त्याचे अनुकरण करण्याचा ट्रेंड आपण अनेकदा पाहिला असेल. सध्या एका व्हायरल होत असलेल्या छायाचित्राच्यानिमित्ताने याचाच प्रत्यय येत आहे. यामध्ये कॅमेरूनचे क्रीडामंत्री पायरे इशमाएल बिडोंग राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांना आदरपूर्वक कुर्निसात करताना दिसत आहेत. पॉल बिया एका राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले असताना हे छायाचित्र टिपण्यात आले होते. मात्र, हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर कॅमेरूनमधील नेटिझन्सनी लगेचच या छायाचित्राची मजेशीर नक्कल करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सोशल मिडीयावर #बिडोंगचॅलेंज हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. कॅमेरूननंतर आफ्रिकेतील नेटिझन्सकडूनही बिडोंग यांच्या छायाचित्राची मजेशीर नक्कल सुरूवात झाली. त्यामुळे सोशल मिडीयावर एकच धम्माल उडाली होती. नेटिझन्सकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक मजेशीर छायाचित्रांचा समावेश आहे.