कर्नाटकमधल्या दोन पायलट मायलेकी लवकरच जगाच्या प्रवासाला निघणार आहेत. या मायलेकी ८० दिवसात जगभ्रमंती करत, ५० हजार किलोमीटरचं अंतर कापणार आहे. आपल्या प्रवासात या दोघीही जगभरातील अनेक देशांना भेट देत महिला सबलीकरणाचा संदेश देणार आहेत.
Viral Video : निर्दयी मालकानं पाळीव श्वानाला गोठवलं
ऑड्री दीपिका मेबेन आणि अॅमी मेहता अशी या मायलेकींची नाव असून त्या दोघीही फ्रेब्रुवारी २०१८ पासून जगभ्रमंतीला निघणार आहेत. ‘माही’ हे छोटसं एअरक्राफ्ट त्या उडवणार आहेत. हे एअरक्राफ्ट सलग साडेचार तास उडू शकतं. आपण फक्त दिवसाच प्रवास करणार असल्याचं त्या दोघींनी सांगितलं आहे. ‘या प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे. विशेष म्हणजे रोमांचकारी प्रवासात माझी मुलगी माझ्यासोबत असणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. अशी प्रतिक्रिया ऑड्रीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे. या दोन्ही मायलेकी जपान, रशिया, अमेरिका, आईसलँड, अफगाणिस्तान, तेहरान, अफगाणिस्तान, ग्रीनलँड अशा वेगवेगळ्या देशात प्रवास करणार आहेत.
Viral : म्हणून Zomato ची जाहिरातबाजी लोकांना मुळीच आवडली नाही