अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्रभु रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आज (सोमवार, २२ जानेवारी) होत आहे. अनेक दिवसांपासून लोक या क्षणाची वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः श्री रामच्या बालस्वरुपातील मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा करणार आहे. रविवारपासून सामान्य जनतेसह प्रसिद्ध लोक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. सर्वत्र राम नामाचा जप सुरु आहे. सोशल मीडियावर राम मंदिराच्या राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान असाच एक पायलटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायटलने प्रभु राम यांच्यावर एक कविता ऐकवत आहे ज्यामध्ये प्रभु राम कोणच्या घरी येतील हे सांगत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय पायलटचा व्हिडीओ

‘राम आएंगे’ अस राम भजत गात अनेक भक्त प्रभु रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. प्रभु रामाच्या भक्तांना एक पायलट आपल्या कवितेतून एक संदेश देत आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल व्हिडीओमध्ये एक पायलट (कॅप्टन मोहित) विमानातील प्रवाशांना भगवान श्रीरामांबाबत एक कविता ऐकवत आहे. ज्यामध्ये ते सांगत आहे की, “प्रभु राम तर एकच आहे, पण मग ते कुठे कुठे जातील?” याच प्रश्नाचे उत्तर पायलटने आपल्या कवितेतून दिले आहे. या व्हिडिओलाही खूप पसंती दिली जात आहे. मोहित त्याच्या कविता आणि अनोख्या शैलीमुळे इंटरनेटवर आधीपासून लोकप्रिय आहे.

हेही वाचा – ‘राम आएंगे’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह केले नृत्य; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

कोणच्या घरी येईल प्रभु राम? काय सांगतोय हा पायलट

व्हिडिओमध्ये पायलट असे सांगत आहे की, “राम वनवासातून परतल्यानंतर घरी परतणार आहे. पण अडचण अशी आहे की प्रभु राम तर एकच आहे, मग ते कोणा-कोणाच्या घरी जातील? जर एखाद्या व्यक्तीने समाजाचा अनादर करून, मुखाने श्रीराम म्हटले तर श्रीराम घरी येणार नाही. बापाच्या एका शब्दासाठी १४ वर्षांचा वनवास करण्यास तयार असलेल्यांच्या घरी राम येईल. जो आपल्या भावासाठी आपली सर्व संपत्ती बलिदान देण्यास तयार आहे, त्याच्या घरी राम येईल आणि जो आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी संपूर्ण जगाशी लढण्यास तयार आहे, राम त्याच्या घरी येईल आणि ज्या दिवशी तुम्ही त्याग करण्यास तयार व्हाल, तेव्हा घरातील आरशात पहा आणि तुम्हाला साक्षात श्रीराम दिसतील”

पायलट पुढे सांगत,”राम हा मनुष्य किंवा देव नाही, तो त्यागाची भावना आहे जर तुम्हाला त्याग करायचा नसेल तर खूप खूप कठीण आहे आणि तुम्हाला त्याग करायचं असेल तर ते करणे खूप सोपे आहे. तर या प्रसंगी भारतातील सर्व खरे संत आणि मौलवी पुजारी उपस्थित आहेत”

हेही वाचा – Fact Check : राम मंदिराबाहेरील ड्रोन शोचा व्हिडीओ व्हायरल? समोर आली खरी बाजू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांना आवडली पायलटची कविता

पायलटच्या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत १ लाख ९२ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
इन्स्टाग्रामच्या @feku_chai_wala हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे- २२ जानेवारीला राम येणार, पण कुठे? त्यांच्याकडून ऐका. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “अगदी १०० टक्के खरे बोलला” दुसऱ्याने लिहिले, “भाऊ खूप जास्त सत्य बोलला”