पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देशभरात आज ‘करवा चौथ’ साजरा केला जात असताना ट्विटरकरांनी आपली शक्कल लढवत या उत्सवाचा देखील ट्रेंड निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी नेटिझन्सनी सोशल करवा चौथच्या उत्सवाला मोदीमय करुन सोडल्याचे दिसते. सध्या सोशल मीडियावर #जशोदा_कैसे_न_जले ट्रेंड जोर धरताना दिसत आहे. करवा चौथच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख करुन टीका केली असल्याचे दिसते. पतीच्या दीर्घ आयुष्याची मागणी करणाऱ्या सणादिवशी पंतप्रधानांच्या पत्नीच्या भावना काय असतील, याचे तर्कवितर्क नेटिझन्स आपल्या परिने मांडताना दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आज त्यांच्यावर जळत असतील हे सांगताना काही नेटिझन्सनी स्मृती इराणी यांना बहाल केलेल्या मंत्रिपदाचाही उल्लेख केल्याचे दिसते. काहींनी ५० वर्षांपासून जशोदाबेन आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. मोदींविरोधातील ट्विटर लाटेला परतवून लावण्यासाठी मोदी समर्थकांनी देखील या ट्रेंडवर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. मोदी समर्थक काँग्रेस आणि आप पक्षाने हा ट्रेंड निर्माण केल्याचा आरोप करताना दिसले. पंतप्रधानांवर अशा प्रकारे टीका करणाऱ्यांसाठी बेअक्कल स्वरुपाच्या प्रतिक्रिया देखील या हॅशटगवर पाहायला मिळाल्या.
प्रसार माध्यमांमध्ये आणि समाजिक व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख अतिशय दुर्मिळ राहिला आहे. पत्नी जशोदाबेन यांच्यासोबत गेली अनेक वर्षे राहत नसल्यामुळे खुद्द मोदींनीही आपल्या वैवाहिकतेच्या मुद्दयावर जाहिररित्या बोलणे कधीही पसंत केलेले नाही. परंतु, जशोदाबेन मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका पारंपारिक भारतीय महिलेप्रमाणेच पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करताना दिसतात.
काही दिवसांपूर्वी जशोदाबेन यांनी उत्तर गुजरातमधील अंबाजी धाम शक्तीपीठात जाऊन मोदींच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रार्थना केली होती.
When PM Modi has accepted in front of everyone that he was married to Jashodha then why does he avoid staying with her.#जशोदा_कैसे_न_जले !
— Neel Shah (@i_neelshah) October 19, 2016
राम मंदिर बनाने वाले रामायण म्यूजियम पर आ गए हैं, देखना अंत में ये व्हाट्सएप ग्रुप बनाकर मुद्दा छोड़ देंगे… #जशोदा_कैसे_न_जले . !!
— Neel Shah (@i_neelshah) October 19, 2016
एक जशोदा आज भी एसी है जो पिछले लगभग 50 साल से अपने पति का हर करवाचौथ पे इन्तज़ार करती है।#जशोदा_कैसे_न_जले
#KarwaChauth— मनीषा मित्तल (@03_manisha) October 19, 2016
Modi Ka Jo Sadaa Idhar Udhar( foreign )Dhyaan Rahe
Jashoda Bechaari Ko Phir #KarwaChauth Pr Kya Maan Rahe #जशोदा_कैसे_न_जले @_iratna pic.twitter.com/GgixYlpUSe— Sneha Arora (@Arora_Sneha01) October 19, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.