अनेकदा आपल्याला रिक्षाचलकांच्या मुजोरीचा प्रत्यय येतो, त्यातून भाडं नाकारण्याचे अनुभव बऱ्याच प्रवशांना येत असतात, पण सगळेच काही असे नसतात. यात काही रिक्षाचालक असेही असतात जे आपल्या कामामुळे सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात, काहीजण रिक्षात राहिलेले प्रवाशांचं सामान वेळोवेळी परत करतात तरी काही प्रवाश्यांना  वेगळ्या सुविधाही देऊ करतात.

वाचा : मुंबईच्या तरुणाची ‘ही’ गोष्ट वाचून तुमचं हृदयही भरून येईल…

२५ वर्षांचा कुरूप्पास्वामी हा त्यापैकीच एक. कोईम्बतूर रस्त्यावर तो रिक्षा चालवतो. त्याचं कौतुक करण्यामागचं कारण म्हणजे एकच आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांकडून आणि लहान मुलांकडून तो कधीही पैसे आकारात नाही. कुरूप्पास्वामीच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्याची वेळ त्याच्यावर आलीय. त्याला पैशांची नितांत गरज आहे खरी, पण तो मात्र गर्भवती माहिलांकडून कधीच पैसे आकारात नाही. कुरुप्पास्वामीने तामिळ साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्याला पुढे शिक्षण घ्यायचंय यासाठी त्याची धडपड सुरूय. तामिळ साहित्याचा त्याला सखोल अभ्यास करायचा आहे, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणं काही शक्य नाही. म्हणून तो दिवसा रिक्षा चालवतो आणि यातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यासही करतो.

वाचा : म्हणून तो १२ वर्षांचा मुलगा भरपावसातही बुजवतोय रस्त्यावरचे खड्डे