Lalkrishna Advani Bharat Ratna Award: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. समारंभानंतर लाइटहाऊस जर्नलिझमला एक फोटो व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या होत्या तर लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले दिसले होते. राष्ट्रपती उभ्या असताना बसून राहणे हा प्रोटोकॉलचा भंग आहे, हे बेशिस्त वर्तन आहे, शिस्त व शिक्षण नसल्याचे उदाहरण आहे असं म्हणत हा फोटो अनेकांनी शेअर केला होता. पण यामध्ये नेमकं तथ्य किती आहे हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर With Love, Bihar ने व्हायरल दावा आधी शेअर केला.

vvpat counting supreme court
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Sharad Pawar
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

इतर वापरकर्ते देखील हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आमच्या तपासाला गूगल कीवर्ड सर्चद्वारे सुरुवात केली आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याच्या अनेक बातम्या आम्हाला आढळल्या.

https://www.hindustantimes.com/india-news/president-murmu-confers-bharat-ratna-upon-bjp-veteran-lk-advani-101711867216842.html
https://www.ndtv.com/india-news/president-droupadi-murmu-confers-bharat-ratna-on-lk-advani-with-pm-narendra-modi-in-attendance-5344413
https://www.livehindustan.com/videos/national/president-drupadi-murmu-honored-lk-advani-with-bharat-ratna-pm-modi-1-9660261

आम्हाला Mirror Now वर या वादाबद्दल देखील एक व्हिडिओ रिपोर्ट आढळला.

आम्ही त्या नंतर X वर ‘President of India’ नावाचे हॅन्डल तपासले.

इथे पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये राष्ट्रपती भारतरत्न दिल्यानंतर बसलेल्या दिसत होत्या.

आम्हाला द हिंदूच्या वेबसाईटवर एक बातमी सापडली, ज्यात म्हटले आहे: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रोटोकॉलचे पालन करत होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माजी प्रेस सचिव अशोक मलिक यांनी X वर सांगितले की, राष्ट्रपती भवन प्रोटोकॉलमध्ये राष्ट्रपती आणि पुरकर प्राप्तकर्ता दोघेही उभे आहेत, तर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह इतर पाहुणे बसलेले आहेत. “प्राप्तकर्ता वृद्ध किंवा अस्वस्थ असल्यास तो/ती बसून राहू शकतो. हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात झाला नाही, मात्र तरीही नेहमीचा प्रोटोकॉल पाळला गेला होता,” तो म्हणाला.

https://www.thehindu.com/news/national/opposition-attacks-pm-modi-for-not-standing-up-when-president-presented-bharat-ratna-to-advani/article68013217.ece

आम्हाला नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील सापडला ज्यामध्ये पंतप्रधान मोदींसह इतर लोक बसलेले दिसत होते.

त्यावर अशोक मलिक यांनी एक पोस्ट देखील केली होती.

निष्कर्ष: राष्ट्रपती मुर्मू उभ्या असताना पंतप्रधान बसून राहिल्याने प्रोटोकॉल भंग जाळायचा दावा दिशाभूल करणारा आहे. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न प्रदान केल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा बसल्या होत्या