Video : शाळा महाविद्यालयातील दिवस हे आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी असतात. विद्यार्थी कधी वर्गात दांडी मारून बाहेर जातात तर कधी वर्गात बसून मजा करतात. शाळा किंवा कॉलेजमधील बॅक बेंचर्सचे जग विशेषतः वेगळे असते. वर्गामध्ये मागच्या बाकावर विद्यार्थी मागे बसतात नुसती मज्जा करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बॅकबेंचर्सची मस्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वर्गात शिक्षक वर्गात शिकवत असताना शेवटच्या बाकावर बसलेला एक विद्यार्थी चक्क कांदा टोमॅटो कापत आहे. एवढंच नाही तर कांदा टोमॅटो कापण्यासाठी मशीन देखील वर्गात आणली आहे. त्यात कांदा टोमॅटो टाकून तो बारीक चिरून घेतो. त्यानंतर भेळमध्ये कांदा टोमॅटो आणि मसाले टाकून एकत्र करून त्याची छान भेळ तयार करतो. वर्गात बसून मित्रांबरोबर भेळ खातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, वर्गात मास्टर शेफ बनण्याची काय गरज होती.

हेही वाचा –भररस्त्यात धावत होता घोडा, मागून येणाऱ्या स्कुटीला अचानक मारली लाथ अन्…. पाहा, Video Viral

वर्गात मजामस्ती मजा वेगळीच असते

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”२४ कॅरेट भेळ’ आणि ‘मौज मस्ती.” हा व्हिडिओ रोझी नावाच्या युजरने तिच्या @rose_k01 हँडलवर शेअर केला आहे. हे शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे – ‘Bankbenchers Pro Max’. या व्हिडिओला आतापर्यंत २.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की,”कॉलेज संपल्यानंतर तो भेळपुरी विकेल आणि मग शिक्षण व्यवस्थेला दोष देईल.”

हेही वाचा – “अशी भाऊबीज कधीही पाहिली नसेल!”, तरुणीने चक्क खारूताईला ओवाळले, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रीमियम लेव्हल बॅकबेंचर

दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, हे प्रीमियम लेव्हल बँकबेंचर आहे. ऑस्कर बाकी असेल तर कुणाला तरी द्या. तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे – “आम्ही हे सर्व कॉलेजमध्येही केले आहे पण हे जरा जास्तच झाले आहे.” चौथ्याने लिहीले आहे, “तिथे वेळ का वाया घालवताय, चाटचे दुकान उघडा.” पाचव्या व्यक्तीने लिहिले आहे,”तो फक्त त्याच्या कामाची तयारी करत आहे.”