Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. येथील ऐतिहासिक वास्तू असो किंवा खाद्य संस्कृती नेहमी चर्चेत असते.तुम्ही पुणेरी पाट्या विषयी अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल पुण्यात अनेक ठिकाणी पाट्या लावल्या जातात. या पाट्यांवर मिश्कीलपणे सूचना लिहिलेली असते. काही पुणेरी पाट्या इतक्या मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये घराच्या गेटवर दोन पाट्या लावलेल्या दिसत आहे. या पाट्यांवरील सूचना वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ एका तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी एक सोसायटी दाखवते. या सोसायटीमध्ये काही घरांच्या गेटवर पाट्या लावलेल्या दिसताहेत. ही तरुणी या व्हिडिओमध्ये दोन पुणेरी पाट्या दाखवते. या दोन पाट्यांपैकी एका पाटीवर लिहिले आहे,
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास स्वर्गप्राप्ती होत नाही म्हणून फुले तोडू नये.” समोर कंसात लिहिलेय, “( एक पुणेकर)”.
त्यानंतर पुढे दुसऱ्या पाटीवर लिहिले आहे, ” दारावरची बेल वाजवल्यावर थोडी वेळ वाट पाहायला शिका घरात माणसं राहतात स्पायडरमॅन नाही” हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पुण्यात अनेक घरांच्या दारावर अशा पुणेरी पाट्या लावलेल्या असतात. यातीलच काही पुणेरी पाट्या व्हायरल होत असतात.

हेही वाचा : “रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल

Peajktaprem या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणेरी पाट्यांची कॉपी केल्याने तुम्ही पुणेकर होत नाही. पुणेकर होण्यासाठी पुण्यात जन्म घ्यावा लागतो.” तर एका युजरने व्हिडिओमध्ये दाखवलेली सोसायटी ओळखली आहे त्याने लिहिलेय, “पिंपळे सौदागरमध्ये ही सोसायटी आहे” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.