Viral Video : दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी दिल्ली मेट्रोतील भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, तर कधी डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी कॉलेजची पोरं मजा मस्ती करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण एका वृद्ध व्यक्तीबरोबर भांडताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण सीटवरून वृद्ध व्यक्तीबरोबर भांडताना दिसत आहे. वृद्ध व्यक्तीसुद्धा त्या तरुणाशी वाद घालताना दिसतात. वृद्ध व्यक्ती म्हणतात, “कशाला बडबड करतोय, तु कोण आहे?” त्यावर तरुण म्हणतो, “मी लहान आहे पण तुम्हाला त्रास देऊ शकतो” त्यानंतर वृद्ध व्यक्ती पायातील बूट काढून मारण्यासाठी पायाला हात लावतात तेव्हा तो तरुण म्हणतो, “रात्रभर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवणार” त्यावर वृद्ध व्यक्ती भांडण्यासाठी जागेवर उभे होतात आणि तरुणाला म्हणतात, “तु काय मला पोलीस स्टेशनमध्ये ठेवणार? मी तुला पोलीस स्टेशनमध्ये टाकणार. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. व्हिडीओ पाहून काही लोकांना प्रश्न पडेल की नेमकी चूक कोणाची आहे? सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

वाद वाढताना पाहून मेट्रोतील लोक दोघांना वाद घालण्यापासून थांबवतात. gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून तरुण आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये नेहमीच वाद होत असतात.” अनेक युजर्सनी वृद्ध व्यक्तीला ट्रोल केले आहेत.