Python Swallowed Duck Video Viral : साप, अजगर म्हटलं तरी अंगावर काटा येतो. पावसाळ्यात मानवी वस्तीत अनेकदा या प्राण्यांचे दर्शन घडते. दरम्यान, सोशल मीडियावरही अजगराच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अजगर प्राण्यांची इतक्या क्रूरपणे शिकार करत असतो की पाहून थरकाप उडतो. कारण अजगर एखाद्या प्राण्यावर थेट हल्ला न करता तो आधी शिकारीला विळख्यात घट्ट आवळून त्याचा जीव घेतो. यानंतर तो त्या प्राण्याला अख्खा गिळतो. सध्या सोशल मीडियावर अजगराच्या शिकारीचा असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात अजगर गिळलेल्या बदकाला तोंडावाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडीओ पाहताना इतका भयानक वाटतोय की तुम्हालाही घाम फुटेल

आतापर्यंत तुम्ही अजगराला शिकार करताना पाहिलं असेल, तो शिकार गिळत असतानाचे भयानक व्हिडीओ पाहिले असतील. या व्हिडीओतही असेच काहीसे दृश्य दिसतेय. दिल्लीच्या ignou कॅम्पसजवळील तलावात एक मोठा अजगर दिसला, जो एका बदकाला गिळल्यानंतर शांतपणे पडून होता.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, तलावाच्या काठावर विश्रांती घेतलेला अजगर अचानक बचाव पथकाच्या नजरेत येतो. कॅम्पसमधील लोकांच्या मते हा अजगर अनेक दिवसांपासून येथे दिसून येत होता आणि यापूर्वीही त्याने अनेक बदकांची शिकार केली आहे.

व्हिडीओमध्ये बचाव पथक अजगराला तलाव परिसरातून रेस्क्यू करतात आणि मोकळ्या रस्त्यावर घेऊन जातात. यावेळी अजगर चवताळतो आणि तो इथे उपस्थित लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न करतो. यानंतर शांत होत गिळलेल्या बदकाला पोटातून बाहेर काढतो.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अजगराला धोका वाटतो किंवा तो तणावाखाली असतो तेव्हा तो गिळलेली शिकार अशाप्रकारे तोंडावाटे बाहेर काढतो, जेणेकरून तो सहज पळून जाऊ शकेल. दरम्यान, अशीच घटना या अजगरासह घडली. अखेर अजगराने शिकार बाहेर फेकताच बचाव पथकाने त्याला इजा न करता जंगलात नेऊन सोडले.

अजगराचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @naturemowgli इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्यात.