Railway Station Girl Reel Shocking Video : आजकाल लोक रीलसाठी इतके वेडे झालेत की ते जीव धोक्यात घालताना मागेपुढे पाहात नाहीत. सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑन करत कधी नाचू लागतात तर कधी अभियन अन् विचित्र चाळे करताना दिसतात. यात रेल्वेस्थानकावर रील शूट करणारे स्वत:च्या जीवाचीदेखील पर्वा करत नाहीत. अनेकदा रील व्हिडीओ शूट करताना त्यांच्याबरोबर फार विचित्र घटना घडतात. अशाप्रकारची एक घटना एका तरुणीच्या बाबतीत घ़डली. ट्रेनमधून उतरून ती स्थानकावर रील व्हिडीओ शूट करत होती. यावेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिला जोरात धक्का दिला. यानंतर असे काही घडले की पाहून तुम्हाला धक्का बसेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमधून उतरल्यानंतर स्थानकावर एक तरुणी रील बनवत नाचतेय. मोबाईल कॅमेऱ्यासमोर उभी राहून ती एकापेक्षा एक जबरदस्त स्टेप्स करतेय. याचवेळी तिथे उपस्थित एक व्यक्ती हे पाहून संतापते आणि सरळ त्या तरुणीला धक्का देते. यावर तरुणी खूप संतापते आणि त्या व्यक्तीला सरळ म्हणते, तू वेडा आहेस का? यावर ती व्यक्ती म्हणते की, ही तमाशा करण्याची जागा आहे का? यावर तरुणी पुन्हा जाब विचारते, तू मला का ढकलले? तसेच व्यक्तीच्या या कृत्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करेल असा इशारा देते.
यावेळी दोघांमध्ये सुरू असलेला वाद पाहण्यासाठी तिथे मोठी गर्दी जमा होते. यादरम्यान इतर दोन पुरुष तिथे येत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण कोणीही माघार घेण्यास तयार होत नाही. त्यानंतर स्थानकावर ट्रेनमधून उतरणारी दुसरी महिला मध्यस्ती करून त्या पुरुषाला सांगते की, त्याने तरुणीला ढकलायला नको होते. नम्रपणे बोलला असता तरी चालले असते. अखेर त्या पुरुषाला त्याची चूक कळते आणि तो तरुणीची माफी मागतो.
हा व्हिडीओ X वर @yati_Official1 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मी काकांच्या धाडसाला सलाम करतो; तर दुसऱ्याने लिहिले की, काकांनी धक्काबुक्की करण्याऐवजी समजूतदारपणे बोलायला हवे होते.